मुंबई, १९ मे २०२३, प्रतिनिधी : छोट्या पडद्यावरील ‘बडे अच्छे लगते है २’ या हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिशा परमार आणि तिचा पती गायक राहुल वैद्य यांनी नुकतीच एक आनंदाची बातमी दिली. अभिनेत्री दिशा गरोदर असून असून लवकरच दिशा आणि राहुल आई-बाबा होणार आहेत.
अभिनेत्री दिशा आणि राहुल वैद्य यांची जोडी नेहेमीच चर्चेत असते. आता त्या दोघांनी आपल्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. दिशा आणि राहुल यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक खास पोस्ट सामायिक केली आहे. या फोटोसह दिशेने आपल्या गरोदरपणाची घोषणा केली आहे.
इंस्टाग्रामवर सामायिक केलेल्या फोटोत दिशा आपलं बेबी बंप दाखवत आहे. तर त्यात दिशा आणि राहुल यांनी काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. तर दोघांच्याही हातात आई आणि बाबा असे लिहिलेली पाटी आहे. तर सोबत सोनोग्राफीचचे अल्ट्रासाऊंड फोटोही त्यांनी पोस्ट केले आहेत. हि पोस्ट पाहताच चाहत्यांनी आणि इतर कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
इंस्टाग्रामवर सामायिक केलेल्या फोटोत दिशा आपलं बेबी बंप दाखवत आहे. तर त्यात दिशा आणि राहुल यांनी काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. तर दोघांच्याही हातात आई आणि बाबा असे लिहिलेले पत्रक आहे. तर सोबत सोनोग्राफीचचे अल्ट्रासाऊंड फोटोही त्यांनी पोस्ट केले आहेत. हि पोस्ट पाहताच चाहत्यांनी आणि इतर कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.