मुंबई, १७ जून २०२३, प्रतिनिधी : छोट्या पडद्यावरील गाजलेली हिंदी मालिका ‘इमली’चा मुख्य अभिनेता करण वोहरा याला अभिनयामुळे प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते. करणचा आनंद सध्या गगनात मावेनासा झालाय यामागे कारण देखील खास आहे ते म्हणजे लग्नाच्या ११ वर्षांनंतर करण बाबा झालाय.
छोट्या पडद्यावरील गाजलेली हिंदी मालिका ‘इमली’चा मुख्य अभिनेता करण वोहरा लग्नाच्या ११ वर्षांनंतर करण बाबा झालाय. करण वोहरा आणि पत्नी बेला वोहरा हे जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत. याबाबत त्याने आपल्या इंस्टाग्रामवरून माहिती दिली. ताणें बेला आणि मुले दोघेही तंदुरुस्त असल्याचे सांगितले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर त्याच्या चचत्यांनी कंमेंट्स मध्ये शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अभिनेता करण वोहरा याने अतिशय खास पद्धतीने ही घोषणा केली. त्याने टी-शर्टवर इट्स ट्विन बॉयज असे लिहून इंस्टाग्रामवर पोस्ट सामायिक केली आणि आपला आनंदही व्यक्त केला.यासह त्याने आणखी एक फोटो पोस्ट केलाय यात त्याने आपल्या पत्नीसोबतचा खास फोटो सामायिक करत त्याखाली “आजचा दिवस. ओम नमः शिवाय.” असे लिहिले .