आर्यनला ड्रग्ज पुरवणारा आरोपी अचित कुमारलाही जामीन

  क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एनसीबीच्या अटकेत होता. मात्र, एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आर्यनची सशर्त जामीन मंजूर करण्यात आली असून आर्यनची आज तुरुंगातून सुटका झाली आहे. तसेच आर्यन खानला अंमली पदार्थ पुरवत असल्याचा आरोप असणाऱ्या अचित कुमारचाही जामीन एनडीपीएस कोर्टाने मंजूर केला आहे.   क्रूझवरील ड्रग्जपार्टी प्रकरणी २० आरोपींपैकी १० […]

आर्यनला ड्रग्ज पुरवणारा आरोपी अचित कुमारलाही जामीन

  क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एनसीबीच्या अटकेत होता. मात्र, एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आर्यनची सशर्त जामीन मंजूर करण्यात आली असून आर्यनची आज तुरुंगातून सुटका झाली आहे. तसेच आर्यन खानला अंमली पदार्थ पुरवत असल्याचा आरोप असणाऱ्या अचित कुमारचाही जामीन एनडीपीएस कोर्टाने मंजूर केला आहे.

  क्रूझवरील ड्रग्जपार्टी प्रकरणी २० आरोपींपैकी १० आरोपींचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. तसेच क्रूझवर रेव्ह पार्टीचे आयोजन करणाच्या आरोपाखाली अटक झालेल्या समीर सेहगल, गोपालजी आनंद, कर्मचारी मानव सिंघल व भास्कर अरोरा या चौघांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. समीर सेहगल हे केनप्लस ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत.

  क्रूझवरील ड्रग्जप्रकरणी आर्यन खान एनसीबीच्या अटकेत होता. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनचा जामीन मंजूर केला, मात्र जामीनसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे उशीरा पोहचल्यामुळे आर्यनला कालची रात्रसुद्धा तुरुंगातच काढावी लागली. आणि अखेर आज आर्यन खान तुरुंगातून बाहेर आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number