वृद्ध दाम्पत्याची ५ लाखांची रोकड लुटून आरोपी फरार

नागपुरात बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध दाम्पत्याला लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरमधील एमआयडीसी परिसरातील एसबीआय बँकेतून दाम्पत्य ५ लाख रुपयांची रोकड पिशवीत भरून नेत असताना दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून फरार झाले. ही घटना ३ मार्च रोजी एमआयडीसीतील एसबीआय बँकेसमोरील घडलेल्या या घटनेमुळे एमआयडीसी परिसर  हादरून गेला असून पोलीस आरोपींचा शोध घेत […]

वृद्ध दाम्पत्याची ५ लाखांची रोकड लुटून आरोपी फरार

नागपुरात बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध दाम्पत्याला लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरमधील एमआयडीसी परिसरातील एसबीआय बँकेतून दाम्पत्य ५ लाख रुपयांची रोकड पिशवीत भरून नेत असताना दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून फरार झाले. ही घटना ३ मार्च रोजी एमआयडीसीतील एसबीआय बँकेसमोरील घडलेल्या या घटनेमुळे एमआयडीसी परिसर  हादरून गेला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

मीना विश्वकर्मा आणि शिवप्रसाद विश्वकर्मा हे दाम्पत्य नागपुरातील यशोदा नगर, हिंगणा रोड परिसरात राहतात. घराच्या बांधकामासाठी विश्वकर्मा दाम्पत्य एसबीआय बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी बँकेतून ५ लाख रुपये रोख रक्कम काढून पिशवीत ठेवून पिशवी पत्नीच्या हातात दिली. आणि तेथून निघून जात असताना दुचाकीवरून दोन आरोपी आले आणि त्यांनी मीना यांच्या हातातील पैशांची पिशवी हिसकावून तेथून पळ काढला. त्या पिशवीमध्ये पाच लाख रुपये, बँकेचे पासबूक आणि मोबील फोन होता.

विश्वकर्मा दाम्पत्यांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. यावेळी एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हे आरोपी घटनास्थळावरून हिंगणा मार्गाकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number