देवदर्शनाहून परतताना भाविकांच्या गाडीला अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू

देवदर्शनाहून परतताना भाविकांच्या गाडीला अपघात होण्याच्या घटना वारंवार घडतात. दरम्यान नुकताच चंद्रपुरमधील भाविकांवर काळाने घाला घातला आहे. चंद्रपुरातील केसला घाट येथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 6 जण जागीच ठार झाले आहेत. तर 7 जण गंभीर जखमी आहेत. चंद्रपुरमधील भोयर कुटुंबीय गोंदिया येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथून परतत असताना मुलमधील केसल […]

देवदर्शनाहून परतताना भाविकांच्या गाडीला अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू

देवदर्शनाहून परतताना भाविकांच्या गाडीला अपघात होण्याच्या घटना वारंवार घडतात. दरम्यान नुकताच चंद्रपुरमधील भाविकांवर काळाने घाला घातला आहे. चंद्रपुरातील केसला घाट येथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 6 जण जागीच ठार झाले आहेत. तर 7 जण गंभीर जखमी आहेत.

चंद्रपुरमधील भोयर कुटुंबीय गोंदिया येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथून परतत असताना मुलमधील केसल घाटात त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीने मार्गावर बंद असलेल्या ट्रकला मागून जोरात धडक दिली. हि धडक इतकी जोराची होती की, गाडीत बसलेल्यांपैकी 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच इतर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

हे सर्व लोक चंद्रपुरातील रहिवाशी आहेत. गोंदिया येथे देवदर्शनाहून येताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी रवाना झाले. अपघात इतका गंभीर होता की जवळपास अर्धी स्कार्पिओ गाडी ट्रकच्या मागील बाजूमध्ये घुसली आहे.

मृतकांमध्ये संभाजी भोयर, कुसुम भोयर, जियान भोयर (दीड वर्ष), दत्तू झोडे, मीनाक्षी झोडे, शशिकला वांढरे, तर जखमींची नावं जितेंद्र पटपल्लीवार, मनीषा भोयर, अंकिता पेटकुले, क्रिश पाटील, सोमी पाटील , शीला पाटील, रेखा खटिकर अशी आहेत. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number