Homeताज्या बातम्याVideo : डोंबिवलीत थिएटरच्या बाल्कनीचा काही भाग कोसळून दोन जखमी
Video : डोंबिवलीत थिएटरच्या बाल्कनीचा काही भाग कोसळून दोन जखमी
थिएटरच्या बाल्कनीचा भाग कोसळून 2 जण जखमी झाल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडला आहे. डोंबिवलीत मधूबन थिएटरच्या बाल्कनीचा काही भाग कोसळल्याने एक महिला आणि एक 6 वर्षीय मुलगी जखमी झाली. “मिशन मंगल” चित्रपटा दरम्यान ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे हाकेच्या अंतरावर असलेल्या राम नगर पोलीस दिड तासानंतर घटनास्थळी पोहचले. विष्णुनगर परिसरातील मंगल धाम सोसायटी मध्ये […]
थिएटरच्या बाल्कनीचा भाग कोसळून 2 जण जखमी झाल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडला आहे. डोंबिवलीत मधूबन थिएटरच्या बाल्कनीचा काही भाग कोसळल्याने एक महिला आणि एक 6 वर्षीय मुलगी जखमी झाली. “मिशन मंगल” चित्रपटा दरम्यान ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे हाकेच्या अंतरावर असलेल्या राम नगर पोलीस दिड तासानंतर घटनास्थळी पोहचले.
विष्णुनगर परिसरातील मंगल धाम सोसायटी मध्ये राहणारी 11 लोक संध्याकाळी 7 च्या सुमारास मधूबन थिएटर मध्ये “मिशन मंगल” चित्रपट पाहण्यासाठी आले होते. चित्रपट संपण्याच्या 5 मिनिट आधी थिएटर मधील बाल्कनीचा काही भाग कोसळला या घटनेत नंदिनी गनफुलें वय वर्ष 42 आणि 6 वर्षाची हेमाली झोपे ही मुलगी जखमी झाली. दोघांवर एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत सुदैवाने ही अनुचित घटना घडली नाही एक मोठा अनर्थ टळला. मात्र पोलिस आणि महापालिका कार्यशैली वर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.