मविआच्या सभेत पटोलेंची गैरहजेरी

महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमूठ सभा पार पडणार आहे. या सभेला उद्धव गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि क्राँग्रेस या तीनही पक्षांचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. उद्धव गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, कांग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. मात्र, मविआच्या या सभेला काँग्रेसचे प्रेदशाध्यक्ष नाना पटोले हजर […]

मविआच्या सभेत पटोलेंची गैरहजेरी

महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमूठ सभा पार पडणार आहे. या सभेला उद्धव गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि क्राँग्रेस या तीनही पक्षांचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. उद्धव गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, कांग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. मात्र, मविआच्या या सभेला काँग्रेसचे प्रेदशाध्यक्ष नाना पटोले हजर न राहण्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडणाऱ्या मविआच्या सभेला नाना पटोले अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पटोलेंची प्रकृती बिघडल्यामुळे ते सभेला गैरहजर राहणार आहेत. मविआच्या सर्वात मोठ्या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित न राहणार असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत.

मविआच्या सभेसाठी पोलिसांच्या अटी

  • जाहीर सभा संध्याकाळी ५ ते रात्री ९.४५ या वेळेतच घ्यावी
  • वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करू नये
  • सभेसाठी आवश्यक असलेल्या शासकीय विभागाच्या परवानग्या घेण्यात याव्या
  • सभेसाठी उभारण्यात आलेल्या व्यासपिठाचं प्रमाणपत्र सादर करावं
  • सभेला जाताना आणि येताना कोणतीही रॅली काढू नये
  • सभेसाठी येणाऱ्यांनी पोलिसांनी दिलेल्याच मार्गानं प्रवास करावा
  • वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी
  • आक्षेपार्ह घोषणाबाजी, असभ्य वर्तन होणार नाही याची काळजी घ्यावी
  • सभेदरम्यान शस्त्र वापरू नये, शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करू नये

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number