T20 World Cup: टीम इंडियाचं टेंशन वाढलं; पोटाच्या संसर्गामुळे स्टार सलामीवीर खेळाडू रुग्णालयात दाखल

संघ व्यवस्थापन त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असून पर्यायी खेळाडूंवर विचार सुरू आहे.

T20 World Cup: टीम इंडियाचं टेंशन वाढलं; पोटाच्या संसर्गामुळे स्टार सलामीवीर खेळाडू रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली: T20 वर्ल्ड कप 2026 दरम्यान भारतीय संघातून चिंताजनक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा याला पोटाच्या संसर्गामुळे (Stomach Infection) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार त्याची प्रकृती बिघडल्याने वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या घडामोडीमुळे संघाच्या संयोजनाबाबत चिंता वाढली आहे.

रिपोर्टनुसार, अभिषेक शर्माचे नामिबियाविरुद्धच्या पुढील सामन्यात खेळणे जवळपास अशक्य मानले जात आहे. भारताचा दुसरा सामना 12 फेब्रुवारी 2026 रोजी नामिबियाविरुद्ध होणार असून तो अरुण जेटली स्टेडीयम येथे खेळवला जाणार आहे. अभिषेक फिट नसल्यास ओपनिंग स्लॉटसाठी संघ व्यवस्थापनाला पर्यायांचा विचार करावा लागणार आहे. 

हेही वाचा: Manipur Violence: मणिपूर पुन्हा पेटले; हिंसाचारात महिला आणि मुलांची सुरक्षित स्थळी धाव, इंटरनेट सेवा बंद

यापूर्वीही अभिषेकने प्रकृती अस्वस्थतेमुळे सराव सत्रात भाग घेतला नव्हता. संघाने नामिबियाविरुद्धच्या सामन्याची तयारी वेगाने सुरू ठेवली असली तरी सलामीवीराची अनुपस्थिती मोठा धक्का मानली जात आहे.

दरम्यान, सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोएशेट यांनी सांगितले की, “अभिषेकला अजूनही पोटदुखीची समस्या आहे. काही दिवसांत तो उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.” संघ व्यवस्थापन त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

T20 वर्ल्ड कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत प्रमुख खेळाडूची अनुपस्थिती संघासाठी मोठी चिंता ठरू शकते. आता सर्वांचे लक्ष अभिषेक शर्मा याच्या प्रकृतीत होणाऱ्या सुधाराकडे लागले आहे.

हेही वाचा: Maharashtra Weather Today: फेब्रुवारीतच मे महिन्याचा तडाखा, हवामान खात्याने दिला मोठा इशारा; पुढील 48 तास महत्त्वाचे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number