Abhijeet Dipke on PM Modi Video: पंतप्रधान मोदींच्या व्हिडीओनंतर अभिजीत दीपकेंचा हल्लाबोल; कमेंट करत म्हणाले, ‘तुमची त्वचा तर…’

पंतप्रधानांच्या या व्हिडिओनंतर कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी त्यांच्यावर टीका केली.

Abhijeet Dipke on PM Modi Video: पंतप्रधान मोदींच्या व्हिडीओनंतर अभिजीत दीपकेंचा हल्लाबोल; कमेंट करत म्हणाले, ‘तुमची त्वचा तर…’

लोकसभेनंतर आता राज्यसभेतही पेपरफुटीविरोधी विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. संसदेत दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले आहे. केंद्र सरकारसाठी हा निर्णय महत्त्वाचा राजकीय टप्पा मानला जात असून, नीट पेपरफुटी प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल करण्याच्या उद्देशाने सरकारने हे विधेयक आणले होते. नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करून ते संसदेत सादर करण्यात आले आणि अखेर मंजूरही झाले.

विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक सेल्फी व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी पेपरफुटीविरोधी कायदा परीक्षा व्यवस्थेला अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. तसेच, पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि अशा गुन्हेगारांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मात्र, पंतप्रधानांच्या या व्हिडिओनंतर कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी त्यांच्यावर टीका केली. इंस्टाग्रामवरील मोदी यांच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना त्यांनी, "तुमची त्वचा देशाच्या भविष्यापेक्षा जास्त चमकदार आहे," अशी टिप्पणी केली. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत पंतप्रधानांच्या चेहऱ्याच्या चमकदारपणावरूनही निशाणा साधला. त्यांची ही कमेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरली आहे.

नीट पेपरफुटी प्रकरण उघड झाल्यापासून पंतप्रधान मोदी सातत्याने सोशल मीडियावर विविध सेल्फी व्हिडिओ शेअर करत असल्याची टीकाही दिपके यांनी केली. दुसरीकडे, पेपरफुटी प्रकरणावरून कॉकरोच जनता पार्टीने देशभर आंदोलन छेडले होते. या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. सुरुवातीला भाजपाने त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास टाळाटाळ केली होती. मात्र, वाढता राजकीय आणि जनतेचा दबाव लक्षात घेऊन अखेर त्यांनी पद सोडले.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनालाही मोठा प्रतिसाद मिळाला होता. विविध राज्यांमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शने करत सरकारवर दबाव वाढवला आणि त्यानंतर प्रधान यांनी राजीनामा दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number