‘आई कुठे काय करते’ ही मालिका आपण आवर्जून पाहतो. या मालिकेची लोकप्रियता प्रचंड आहे. अलीकडे अरुंधतीचे लग्न झाल्यावर मालिकेत रोमॅंटिक ट्रॅक सुरू आहे. मालिकेतील अरुंधती आणि आशुतोष यांची केमिस्ट्री लोकांना आवडत आहे. आता येणाऱ्या भागांमध्ये त्यांच्यात जवळीक वाढलेली दिसून येईल. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत नुकतेच अरुंधती आणि आशुतोष लग्नबंधनात अडकले आहेत. दरम्यान मालिकेच्या आगामी भागाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात अरुंधती आणि आशुतोष यांच्यातील गोड संवाद आणि प्रेमळ क्षण पाहायला मिळत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत अरुंधतीची तब्येत बिघडल्याने ती आराम करताना दिसत आहे. तर आशुतोष तिला प्रेमाने गोंजारताना दिसतोय. तो तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवत आहे. हे पाहून आता मालिकेत पुढे काय होणार याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. अलीकडेच मालिकेत अरुंधतीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ती म्हणाली,”तुमचा सहवास मला हवाहवासा वाटतो. तुम्ही जवळ असलात की मला खूप बरं वाटतं. मला तुम्ही खूप आवडता आशुतोष..’ त्यावर आशुतोष म्हणतो, ‘तूही मला खूप आवडतेस.’ हे पाहून मालिकाप्रेमींना आनंद झाला आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर या अरुंधती ही भूमिका साकारत आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ओंकार गोवर्धन हा आशुतोष ही भूमिका साकारतो. या मालिकेमध्ये अनिरुद्ध देशमुख ही भूमिका अभिनेते मिलिंद गवळी हे साकारतात. तर संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते.