आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा

महाराष्ट्र राज्य पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यासंबंधी या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर गेले असताना त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आदित्य ठाकरे आयोध्या दौऱ्यावर जाणार असून ते दौऱ्यातुन शक्तिप्रदर्शन करणार असल्याचंही बोललं जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे त्यांच्या नाशिक दौऱ्यावर […]

आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा

महाराष्ट्र राज्य पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यासंबंधी या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर गेले असताना त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आदित्य ठाकरे आयोध्या दौऱ्यावर जाणार असून ते दौऱ्यातुन शक्तिप्रदर्शन करणार असल्याचंही बोललं जात आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत हे त्यांच्या नाशिक दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत त्यांनी बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्याचं समजतंय. यावेळी त्यांनी या दौऱ्याच्या नियोजनाचा आढावा घेतला आहे. आदित्य ठाकरे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोध्येला जाऊन रामाचे दर्शन घेणार आहेत. तर अयोध्या दौऱ्यात शक्तिप्रदर्शन करण्याचीही आदित्य ठाकरेंची तयारी आहे. आदित्य ठाकरेंचा हा दौरा यशस्वी करण्याची जबाबदारी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवर सोपिवली गेली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number