Aaditya Thackeray : कॉफीवरून टोलेबाजी! नितेश राणेंनी डिवचल्यानंतर आदित्य ठाकरेंनी ‘करून दाखवलं’

काल विधानभवनात भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर कॉफीवरून मिश्किल टोला लगावला होता.

Aaditya Thackeray : कॉफीवरून टोलेबाजी! नितेश राणेंनी डिवचल्यानंतर आदित्य ठाकरेंनी ‘करून दाखवलं’

काल विधानभवनात भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर कॉफीवरून मिश्किल टोला लगावला होता. त्यानंतर आज आदित्य ठाकरे कॉफी घेऊन विधानभवनात दाखल झाले. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पावर सभागृहात चर्चा सुरू असताना नितेश राणे बोलताना म्हणाले की, एमएमआर क्षेत्र वॉटर मेट्रोने जोडले जाणार असून नरिमन पॉईंटला पोहोचण्यासाठी पोहण्याची गरज नाही किंवा पेंग्विनलाही डिस्टर्ब करायची गरज नाही. जुहू–बांद्रा मार्गे थेट नरिमन पॉईंटला जाईन,” असा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा- Ashok Kharat Case : खरातचं गुन्हेगारी क्षेत्रातील पहिलं हत्याकांड ते अनेक बड्या अधिकाऱ्यांना 2 कोटी देणं; राष्ट्रवादीच्या नेत्याचा सनसनाटी दावा

यावर आदित्य ठाकरे यांनी “चिकन भेटतं का?” असा प्रश्न उपस्थित करत प्रत्युत्तर दिलं. त्यावर राणे यांनी “हो, तुम्हाला चिकन आणि कोल्ड कॉफी देतो, मला माहिती आहे तुम्हाला कोल्ड कॉफी आवडते,” असं म्हणत वातावरणात हशा पिकवला होता. या पार्श्वभूमीवर आज आदित्य ठाकरे कॉफी घेऊन विधानभवनात आल्याचे पाहायला मिळाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number