Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरात रक्तरंजित थरार! घरात घुसून केले सपासप वार अन् डोक्यावर पिस्तुल रोखत…

छत्रपती संभाजीनगर शहरातील बाजाजनगर परिसरात एका महिलेकडून दुसऱ्या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरात रक्तरंजित थरार! घरात घुसून केले सपासप वार अन् डोक्यावर पिस्तुल रोखत…

छत्रपती संभाजीनगर शहरातील बाजाजनगर परिसरात एका महिलेकडून दुसऱ्या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजाजनगर येथील साई श्रद्धा पार्कमध्ये आरोपी महिला शैलजा सोनार थेट या पीडित महिला साधना सोनपेठकर यांच्या घरात घुसली आणि तिच्यावर चाकूने हल्ला करत गंभीर जखमी केले. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला शैलजा सोनार आणि पीडित महिला साधना सोनपेठकर यांच्यात वैयक्तिक वाद सुरु होते. त्याच रागात शैलजा सोनार या सकाळच्या सुमारास साधना सोनपेठकर यांच्या घरी गेली. त्यावेळेस घरात साधना सोनपेठकर आणि त्यांची सासू होत्या. घरात घुसताच आरोपी शैलजा सोनार हिने साधना यांच्या कपाळावर पिस्तूल तानली. ते पाहून साधना यांच्या सासूने पिस्तूल हिसकावून ती खिडकीच्या बाहेर फेकली. हे पाहून शैलजा साधनाच्या सासूचा गळा दाबायला लागली. सासूला वाचवायला आलेल्या साधनावर शैलजाने सपासप चाकूने वार केले. यात अती रक्तस्राव झाल्याने साधना यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी महिलेला ताब्यात घेतले. 

हेही वाचा- Chhatrapati Sambhajinagar Crime : दोन तासांपूर्वी हसत-खेळत फोटो काढला, मित्रांसोबतचा फोटो स्टेटसला ठेवला; नंतर मित्रांनीच केला विश्वासघात

घटनास्थळी पिस्तूल देखील आढळून आले असून, हल्ला अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यात पीडित महिलेचा जागीच मृत्यू झाला. झटापटीदरम्यान आरोपी महिला किरकोळ जखमी झाली असून तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या हत्येमागील नेमके कारण म्हणजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत साधना सोनपेठकर यांचे पती महेंद्र सोनपेठकर यांचे आणि खून करणारी महिला शैलजा सोनार यांचे संबंध होते. यापूर्वी शैलजा यांनी महेंद्र यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा ही पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number