मुंबई : दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रासह देशातील विविध भागांमध्ये काल आंदोलन पार पडले. दरम्यान, मुंबईतही अनेक नागरिक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. यावेळी आंदोलकांवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई पोलीस यंत्रणा सज्ज झाली. परिणामी, नागरिकांचा आक्रोश पाहायला मिळाला. आंदोलनादरम्यान एका मुंबईकर महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या महिलेने केंद्रासह राज्यातील प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या वागणुकीवरही त्यांनी बोट ठेवले आहे. या महिलेचा व्हिडीओ शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करत त्यांचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र कन्या शोभतेस, अशा शब्दांत संजय राऊत यांनी महिलेला शाबासकी देत त्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे.
जय महाराष्ट्र ,मुली!
शोभतेस महाराष्ट्र कन्या!
हाच संताप हे भ्रष्ट सरकार जाळून टाकेल!@Dev_Fadnavis @mieknathshinde @PMOIndia pic.twitter.com/jOMH5NbalD — Sanjay Raut (@rautsanjay61) July 20, 2026