पुणे : पुण्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल बालवडकर अडचणीत आले आहेत. कुख्यात गुंड निलेश घायवळसोबत पार्टी करतानाचा बालवडकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घायवळसोबत बालवडकर पार्टी करत नाचतानाही दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विरोधकांकडून टीकेची जोड उठवली जात आहे. आधीच अजित पवारांकडून अनेक गुंडांच्या कुटुंबियांना तिकीट दिल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. त्यात […]
पुणे : पुण्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल बालवडकर अडचणीत आले आहेत. कुख्यात गुंड निलेश घायवळसोबत पार्टी करतानाचा बालवडकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घायवळसोबत बालवडकर पार्टी करत नाचतानाही दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विरोधकांकडून टीकेची जोड उठवली जात आहे. आधीच अजित पवारांकडून अनेक गुंडांच्या कुटुंबियांना तिकीट दिल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. त्यात अमोल बालवडकर व घायवळ यांचे मित्रसंबंध या व्हिडिओतून समोर आल्याने अजित पवारांचीही डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.