CJP’s Big Announcement : स्ट्रॅटेजी ठरली! CJP उलगडणार पुढची रणनिती, आज होणार मोठी घोषणा; प्रवक्ते आशुतोष रांका यांची इंस्टा पोस्टद्वारे माहिती

छत्रपती संभाजीनगर : कॉक्रोच जनता पार्टीची दोन दिवसीय बैठक अभिजीत दिपकेंच्या घरी सुरू असून प्रवक्ते आशुतोष रांका यांनी आज मोठी घोषणा होणार असल्याची पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली. देशातील युवांनी मोठ्या प्रमाणात सीजेपीला प्रतिसाद दिला असून त्यामुळे संघटनेची ताकद वाढली असून जबाबदारीही वाढली असल्याचे रांका यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे. तसेच दोन दिवसांच्या बैठकीत काय काय ठरले, याची […]

CJP’s Big Announcement : स्ट्रॅटेजी ठरली! CJP उलगडणार पुढची रणनिती, आज होणार मोठी घोषणा; प्रवक्ते आशुतोष रांका यांची इंस्टा पोस्टद्वारे माहिती

छत्रपती संभाजीनगर : कॉक्रोच जनता पार्टीची दोन दिवसीय बैठक अभिजीत दिपकेंच्या घरी सुरू असून प्रवक्ते आशुतोष रांका यांनी आज मोठी घोषणा होणार असल्याची पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली. देशातील युवांनी मोठ्या प्रमाणात सीजेपीला प्रतिसाद दिला असून त्यामुळे संघटनेची ताकद वाढली असून जबाबदारीही वाढली असल्याचे रांका यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे. तसेच दोन दिवसांच्या बैठकीत काय काय ठरले, याची माहिती ते आज सर्व देशवासियांना देणार असून मोठी घोषणा होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आज, ६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सीजेपीच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा : Dombivli Viral Video: गर्दीत महिला प्रवासी पडली, प्लॅटफॉर्मवर एकच गोंधळ; महिला टीसीच्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव, नेमकं काय घडलं?

कॉक्रोज जनता पार्टीचे पुढील ध्येयधोरण ठरवण्यासाठी बुधवारपासून दोन दिवसीय बैठकीला सुरूवात झाली. ही बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजीत दीपके यांच्या घरी होत आहे. या बैठकीत काल १३ सदस्य उपस्थित होते. विविध मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे बैठकीपूर्वी अभिजीत दीपकेंनी सांगितले. अभिजीत म्हणाले की, आम्हाला देशभरातून समर्थन मिळालं आहे. त्यामुळे आमचे संघटन संपूर्ण देशभरात कसे वाढवले जाईल, पुढे कुठले पाऊल उचलले पाहिजे यावर बैठकीत चर्चा होईल. दोन दिवसीय आमचा कॉक्रोज इन्कलेव्ह होत आहे. त्यानंतर सविस्तर माहिती दिली जाईल. झारखंड येथील विद्यार्थांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. तिथे जाऊन त्यांची भेट घेणार आहोत. देशभरात आमच्या आंदोलनाला यश मिळत होतं. आज राजकीय पार्टीची परिस्थिती खूप वाईट आहे. एका पक्षातून निवडून येतेय नंतर दुसऱ्या पार्टीत दिसते. ईडी, सीबीआयचा वापर करून पक्ष फोडले जात आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number