Sheetal Mhatre : अंधारे आणि म्हात्रेंमध्ये ट्विटर वॉर; अंधारेंच्या टीकेनंतर शितल म्हात्रेंकडून पुन्हा पलटवार

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरुन सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रे यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

Sheetal Mhatre : अंधारे आणि म्हात्रेंमध्ये ट्विटर वॉर; अंधारेंच्या टीकेनंतर शितल म्हात्रेंकडून पुन्हा पलटवार

अशोक खरात प्रकरण आता केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित राहिलेले नाही. यात अनेक राजकीय नेत्यांची नावे आणि कनेक्शन्स समोर येत आहेत. अशोक खरात प्रकरणाने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाचे पडसाद दोन्ही शिवसेनेवर पडत असल्याचे दिसत आहेत. शीतल म्हात्रे यांनी या प्रकरणात थेट ‘मातोश्री’ला खेचल्याने या वादाला आता नवीन वळण मिळाले आहे. शिवसेना शिंदे पक्षातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत दावा केला की, अशोक खरात याच्या संस्थेला मिळालेली पाण्याची जोडणी ही ‘मातोश्री’वरून आलेल्या आग्रहाखातर देण्यात आली होती.

हेही वाचा- Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणी शितल म्हात्रेंच्या ‘त्या’ गंभीर आरोपाला सुषमा अंधारे यांचे प्रत्युत्तर; काय आहे नेमका वाद?

शीतल म्हात्रे यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली. म्हात्रे यांची ही धडपड ‘केविलवाणी’ असल्याचे म्हणत, विधान परिषदेच्या आगामी जागा मिळवण्यासाठी शिंदे गटातील नेत्या नीलम गोऱ्हे आणि शीतल म्हात्रे या दोघीही स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी असे आरोप करत आहेत. या प्रकरणावरून शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यांच्याकडून एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. 

हेही वाचा-Sheetal Mhatre Tweet : खरात प्रकरणात शिंदे सेनेच्या शितल म्हात्रे संतापल्या, संस्थेला पाणीपुरवठा करण्यावरून ओढले ताशेरे, म्हणाल्या, ‘पाण्याची जोडणी ही मातोश्री च्या मॅडमच्या आग्रहाखातर…’
अशातच शीतल म्हात्रे यांच्या आणखी एक ट्वीट समोर आला आहे, ज्यात त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावर पलटवार केला आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, “ताई, उबाठाच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेली विधान परिषदेची जागा मिळवण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमची किती चापलूसी कराल??? प्रियांका चतुर्वेदींची राज्यसभेची जागा घेण्याचा तुमचा डाव फसला…आता थेट उबाठाच्या जागेवरच डोळा आहे की काय तुमचा??? त्यातच आदू बाळाने गेल्या आठवड्यात गांजा राऊतची कॉलर धरली म्हणे… ताई, खासदार-आमदार व्हायची स्वप्नं आता सोडून द्या…मॅडमच्या इशाऱ्यावर तुम्ही कितीही नाचलात तरीही तुमच्या राजकीय जीवनातला अंधार काही दूर होणार नाही…” दरम्यान आता नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरुन सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रे यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number