मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा पुतळा उभारण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने हा निर्णय घेतल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांनी दिली आहे. येत्या २३ एप्रिलला सचिन तेंडुलकरच्या ५० व्या वाढदिवसाला किंवा वन डे वर्ल्ड कपदरम्यानच्या सोहळ्यात पुतळ्याचं अनावरण पार पडेल. वानखेडे स्टेडियमवर सध्या सचिन तेंडुलकरच्या नावाने एक प्रेक्षक गॅलरी असून त्याच मैदानात आता सचिनचा पुतळाही उभारला जाणार आहे.
अमोल काळे म्हणाले की, सचिन तेंडुलकर एक भारतरत्न आहे. त्याने क्रिकेटसाठी काय केले हे सर्वांना माहीत आहे. तो 50 वर्षांचा झाल्यावर हे MCA कडून कौतुकाची भेट असले. मी तीन आठवड्यांपूर्वी त्याच्याशी बोललो आणि त्याची संमती घेतली. सचिन तेंडुलकरने वयाच्या सोहळ्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारताकडून पदार्पण करणारा तो सर्वात लहान खेळाडू आहे. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावली आहेत. कसोटी कारकिर्दीमध्ये सर्वाधिक धावा करणार विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्याने १५ हजार ५३३ धावा केल्यात. सचिन तेंडुलकरने भारतासाठी २०० कसोटी सामने, ४६३ एकदिवसीय आणि एक टी-२० सामना खेळला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके (१००) आणि धावा (३४,३५७) करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहेत.
याबाबत मास्टर ब्लास्टर सचिनने सांगितले की, माझा प्रवास याच मैदानातून झाला. वयाच्या बाराव्या वर्षी मी मुंबईकडून क्रिकेट खेळतोय. शारदाश्रम शाळेकडून खेळत असताना , मी माझ्या सिनियर टीमला त्यांना सपोर्ट करण्यासाठी या स्टेडिअमवर एकदा आलो होतो. दुसरीकडे तेव्हाच आचरेकर सरांनी माझी मॅच शिवाजी पार्क मैदानावर ठेवली होती. त्यावेळेस आचरेकर सर मला खूप ओरडले होते. ते माझ्या मनाला खूप लागले होते. तेव्हाच माझा प्रवास सुरु झाला. त्यानंतर मी इथे रणजी खेळलो.