Kishori Pednekar Statement: पेडणेकरांच्या ‘त्या’ वक्तव्याने सभागृहात राडा! सत्ताधाऱ्यांचा तीव्र आक्षेप; रितू तावडेंनी सांगितल, "जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत…"

अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मुंबई महापालिकेच्या सभागृहात चांगलाच राडा झाल्याचे पाहायला मिळाला.

Kishori Pednekar Statement: पेडणेकरांच्या ‘त्या’ वक्तव्याने सभागृहात राडा! सत्ताधाऱ्यांचा तीव्र आक्षेप; रितू तावडेंनी सांगितल, &quotजोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत…&quot

अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मुंबई महापालिकेच्या सभागृहात चांगलाच राडा झाल्याचे पाहायला मिळाला. महापौरांचा सन्मान राखला गेला पाहिजे या विशाखा राऊत यांच्या हरकतीचा मुद्द्यावर बोलताना सभागृह नेते गणेश खणकर यांनी पूर्वी आम्हाला बोलू दिलं जात नव्हतं, त्यामुळे आता नवीन सदस्यांनी महापौरांचा मान राखला पाहिजे असे म्हटले. त्यावर उत्तर देताना किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात  केलेल्या विधानावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवून माफीची मागणी केली. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी किशोरी पेडणेकर सभागृहात येऊन सभागृहाची माफी मागत नाहीत तोपर्यंत सभागृह तहकूब राहणार असल्याची माहिती दिली. 

यावेळी किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "सत्ताधारी पक्षाला सभागृह चालवायच आहे की नाही हा प्रश्न आहे. फंडाच्या वाटपात असमानता आणली आहे, त्याच्यावर चर्चा…आम्हाला ३३% आरक्षणाला पाठिंबा द्या असे म्हंटल पण त्यावर आम्हाला आमची मत मांडायची आहे. चार माजी महापौर आहेत त्यांना बोलू दिले जात नाही. मला आता एमएस विभागाकडून व्हिडिओ ऑडियो लागेल. मी म्हंटल असे की “बाळासाहेबांचे विचार विकत घेतले” असे म्हंटल. पण ते तोडून विचार हा शब्द काढला….  मुद्दाम गदारोळ करण्याचा प्रयत्न केला… आम्ही बाळासाहेबांच्या कुशीत आहे हे काय सांगतात आम्ही मुशीत वाढलो…सभागृह चालविण्याची जबाबदारी त्यांची आहे… चुकीचा पद्धतीने सभा तहकूब मांडत आहे… दरेकर शंड शब्द बोलले ते ऐकले नाही असे म्हणत आहे आणि मी काही बोलली नाही पण ते ऐकले… मी माफी मागणार नाही… मी काय बोलली नाही…महिला सभागृहात असताना शंड हा शब्द वापरला… एमएस विभाग पण असे करत असेल तर महापालिकेची धुरा कशी पुढे नेणार माहीत नाही…"

हेही वाचा- Arvind Sawant On Nishikant Dubey : दुबेंचा आदित्य ठाकरेंवर तो आरोप आणि सभागृहात गदारोळ; अरविंद सावंत-सुप्रिया सुळे संतापले

यावर मुंबई महापौर रितू तावडे म्हणाल्या की, "आज सभागृहात बजेट सतरा साठी घेतलं होत. काल किशोरी पेडणेकर यांनी भाषण केलं आणि त्यानंतर ते निघून गेले. आज हरकतीचा मुद्द्यावरून किशोरी पेडणेकर यांनी बोलायल सुरुवात केली. त्यांच्या वक्तव्यामध्ये एक स्टेटमेंट केलं बाळासाहेब यांना विकत घेतलं का अस आक्षेप हॅरी बोलल्या. हे राजकीय विचाराची खालची पातळी गाठणार आहे. आम्ही हे एकल ते रेकॉर्डवर आलं. ते वारंवार अस बोलतात त्याचं अस वागणं बरोबर नाही.सगळ्याची भाषण झाल्यावर त्यांना बाळासाहेब ठाकरे यांची विषयी बोलल्या.माफी मागावी पण त्यांनी माफी मागितली नाहीमुंबईचे ट्रस्टी म्हणून काम करायला आलो.अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी सभा असते अशा पद्धतीचा वारंवार बोलत आहे. उद्यापासून सभागृह लाइव्ह करणार. बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान सहन करणार नाही.हे ठीक नाही."
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number