Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर हादरलं! ठाकरे गटाच्या उपतालुका प्रमुखांवर चाकू हल्ला; दोन जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगरमधील एमआयडीसी परिसरातील ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख कृष्णा राठोड यांच्यावर मध्यरात्री चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली.

Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर हादरलं! ठाकरे गटाच्या उपतालुका प्रमुखांवर चाकू हल्ला; दोन जण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर येथील ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख कृष्णा राठोड यांच्यावर मध्यरात्री चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात त्यांच्यासोबत असलेले सहकारी मन्नू राठोड हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी रात्री सुमारे 12 वाजेच्या सुमारास कामगार चौक परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा राठोड यांचे कामगार चौकात ‘जय भवानी’ नावाचे हॉटेल आहे.

हेही वाचा- Pune Porsche Case: पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणाबाबत मोठी अपडेट; 22 महिन्यांनंतर विशाल अग्रवाल यांना जामीन मंजूर

रात्री हॉटेल बंद करून कृष्णा राठोड आणि त्यांचे सहकारी मन्नू राठोड हे चारचाकी वाहनाने घरी जात होते. कामगार चौकात पोहोचताच समोरून आलेल्या दुचाकीवरून तिघा अज्ञातांनी त्यांचा रस्ता अडवला. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली. या झटापटीदरम्यान अज्ञात आरोपींनी कृष्णा राठोड यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मन्नू राठोड यांच्यावरही आरोपींनी चाकूने वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले.घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करत दोघांनाही छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या दोघांवर उपचार सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number