SSC Exam: पेपरफुटीनंतर आता थेट प्रश्नपत्रिकांची चोरी; परीक्षेआधीच भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका चोरीला

सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्यामध्ये परीक्षेआधीच दहावीचा भूगोल पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

SSC Exam: पेपरफुटीनंतर आता थेट प्रश्नपत्रिकांची चोरी; परीक्षेआधीच भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका चोरीला

सध्या दहावी-बारावीच्या परीक्षादरम्यान पेपरफुटीचे प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा, पण याच परीक्षेला आता ‘पेपरफुटीच्या’ वाळवीने पोखरल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून राज्याच्या शिक्षण मंडळाने शर्थीचे प्रयत्न केलेत. मात्र त्यानंतर ही वारंवार पेपर फुटत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्यामध्ये परीक्षेआधीच दहावीचा भूगोल पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

हेही वाचा- Viral Memes on LPG Cylinder : सिलेंडरची साडी ते अंत्ययात्रा, पती-पत्नीमधील कॉमेडी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स
सांगोला येथील सांगोला विद्यामंदिरच्या स्ट्रॉंग रूमचे कुलूप तोडून उद्या होणाऱ्या दहावी बोर्डाच्या भूगोलाच्या पेपरच्या प्रश्नपत्रिका चोरून नेल्याचे उघड झाले आहे. यावेळी 50 प्रश्नपत्रिका चोरून नेल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून भूगोलाचा पेपर फुटल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे गुरूवारी होणाऱ्या भूगोलाच्या पेपरच्या गोपनीयतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा तपास सुरू केला आहे. 

हेही वाचा- Adoption Maternity Leave : मुल दत्तक घेणाऱ्या मातांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, आता मिळणार 12 आठवड्यांची मॅटर्निटी लिव्ह, जाणून घ्या
या तपासातून शाळेमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी ‘स्ट्रॉन्ग रूम’चे कुलूप तोडून हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, यामुळे पेपर पुन्हा होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान दरम्यान, प्रश्नपत्रिका चोरीला गेल्यामुळे हा पेपर रद्द होणार की नवीन प्रश्नपत्रिका संच पुरवले जाणार, याबाबत शिक्षण मंडळाने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number