चालत्या ट्रकने घेतला पेट

वाहनांना आग लागल्याच्या घटना नाशिक मध्ये सुरु असताना पुन्हा एक घटना समोर येत आहे. नाशिक – मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला. चालत्या ट्रकने पेट घेतला आहे. प्रसंगावधान राखत चालकाने ट्रक साइडला लावून जीव वाचवला आहे. महामार्ग पोलीस केंद्र घोटी, टोल प्लाझा अग्निशमन दल चे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग […]

चालत्या ट्रकने घेतला पेट

वाहनांना आग लागल्याच्या घटना नाशिक मध्ये सुरु असताना पुन्हा एक घटना समोर येत आहे. नाशिक – मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला. चालत्या ट्रकने पेट घेतला आहे. प्रसंगावधान राखत चालकाने ट्रक साइडला लावून जीव वाचवला आहे. महामार्ग पोलीस केंद्र घोटी, टोल प्लाझा अग्निशमन दल चे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. बाहेरून आग आटोक्यात आणली मात्र आतून ट्रकने परत आग पकडली आहे. आगीत ट्रक जळून खाक झाला आहे. ट्रकला आग लागल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. नाशिक – मुंबई वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. गेल्या काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या उपनगर परिसरात राज्य परिवहन मंडळाच्या धावत्या बसला आग लागल्याची घटना समोर आली होती. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेला काही उलटले नाही तोवर दुसरी घटना घडली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number