NCP Sharad Pawar Gat : लग्नाचं निमित्त की राजकीय गुप्त बैठकीचा अजेंडा?, शरद पवार गटाचे प्रमुख नेते जमले एकत्र; कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांचीही एक गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे.

NCP Sharad Pawar Gat : लग्नाचं निमित्त की राजकीय गुप्त बैठकीचा अजेंडा?, शरद पवार गटाचे प्रमुख नेते जमले एकत्र; कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

पणे : सध्या राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांचीही एक गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या पक्षात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. दोन्ही पक्षांचे विलीनीकरण, आमदारांचे पक्षांतर, पक्षाचे प्रदेक्षाध्यक्ष पद अशा अनेक मुद्द्यांवर राज्यातील राजकारणात चर्चा रंगली आहे. या दरम्यान, शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येत, या विविध मुद्द्यांवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून मिळत आहे. 

हेही वाचा : Ladki Bahin Yojana: महिलांनो लक्ष द्या! eKYC केली नसेल तर ‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता थांबणार; जाणून घ्या सोपी प्रक्रिया

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात एका लग्नानिमित्त काही नेतेमंडळी एकत्र आले होते. तिथेच सर्वांची एकमेकांशी भेट झाली. जवळच एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले असता तिथे त्यांच्यात काही मुद्द्यांवर चर्चा झाली. ज्यावेळी सुनील तटकरे आणि शरद पवार यांची भेट, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 22 आमदार भाजपमधून लढणार असल्याचे रोहित पवारांचे वक्तव्य, तसेच आमदार सुनील यांनी रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे विधान अशा एक ना अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या बैठकीला माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, शरद पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम आदी मान्यवर उपस्थित होते. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number