मुंबईतील अत्यंत वर्दळीचा भाग असलेल्या झवेरी बाजार परिसरात मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. चायना बाजार या पाचमजली इमारतीला आग लागली असून त्यात कोणतीही जीवीतहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस दाखल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या १२ हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. इमारतीत अडकलेल्या ५० ते ६० लोकांना वेळीच बाहेर काढण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून इमारतीतील ६० लोकांना वेळीच बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. जवळपास १२ अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न जारी आहे. याशिवाय पाचमजली इमारतीत भीषण आग लागल्याची माहिती समजताच झवेरी बाजार परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.
झवेरी बाजार येथील चायना बाजार इमारत ही पाच मजली आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास या इमारतीला आग लागली. यामध्यो कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीमुळं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक याचा तपास करत आहेत. सध्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. आग विझवण्यासाठी क्रेनचाही वापर करण्यात आला आहे. इमारतीच्या आणखी एका भागात कूलिंगची प्रक्रिया सुरू झाली आहे.
आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी क्रेनचाही वापर करण्यात येत आहे. इमारतीतील भीषण आगीमुळे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील छताचा काही भाग आणि जिन्यांचा काही कोसळला आहे. त्यामुळं आता या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नसली तर संपत्तीचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे. चायना बाजार परिसरातील इमारतीतील आग विझवण्यासाठी स्थानिकांकडूनही प्रयत्न केले जात आहे. याशिवाय घटनास्थळी जमावाने मोठी गर्दी केली आहे.