सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. अशातच जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषदांच्या बाबतीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने 31 जानेवारीची डेडलाईन दिली होती. 31 तारीख अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाकडे 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदतवाढ मागितली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दाखल केलेल्या या अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता वर्तावली जात असून न्यायालयाने मुदतवाढ नाकारली, तर निवडणूक आयोगाला तत्काळ यावर निवडणुका घ्याव्या लागतील. तसेच 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाल्यास निवडणूकांची अधिकृत घोषणा पुढील दोन दिवसांत होऊ शकते. त्यामुळए सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेण्याची तयारी पूर्ण केली होती. अशातच आता, राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.