Solapur Malshiras Pickup Accident : आनंदाचा प्रवास क्षणात काळात बदलला! देवदर्शन करून परतणारी पिकअप गाडी विहिरीत कोसळली; 8 ते 10 भाविकांचा मृत्यू

सोलापूरच्या पंढरपुरातून मोठी दुर्घटना घडली आहे. सोलापूर येथील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात घडला आहे.

Solapur Malshiras Pickup Accident : आनंदाचा प्रवास क्षणात काळात बदलला! देवदर्शन करून परतणारी पिकअप गाडी विहिरीत कोसळली; 8 ते 10 भाविकांचा मृत्यू

सोलापूरच्या पंढरपुरातून मोठी दुर्घटना घडली आहे. सोलापूर येथील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात घडला आहे. या भीषण अपघातात पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे 8 ते 10 भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. तसेच 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले असल्याची बातमी समोर आली आहे.

हेही वाचा- Mumbai Airport Bomb Threat : आणखी एक धमकी! मुंबई विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याचा ई-मेलम; महत्त्वाची माहिती निष्पन्न

जखमीवर पंढरपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच मृतांमध्ये महिला, लहान मुलांचा देखील समावेश आहे. अपघातामधील सर्व मृत भाविक पंढरपूरच्या रांजणी गावचे असून भाविक म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. सिद्धनाथांचं दर्शन करून गावाकडे परतत असताना माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक एका विहिरीत टेम्पो कोसळला.

दरम्यान वाहन चालकाचा नियंत्रण सुटून पिकअप वॅन विहिरीत कोसळल्याचा प्राथमिक माहिती आहे. रस्त्यालगत असलेल्या या विहिराला सरंक्षण कठडा देखील नव्हत्या, ही विहिर पूर्णपणे उघडी होती. या घटनेनंतर मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सूरू आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. या भीषण अपघातानंतर संपूर्ण पंढरपुरात खळबळ उडाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number