Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरात खळबळ! शिवसेना उपजिल्हाप्रमुखांवर जीवघेणा हल्ला

छत्रपती संभाजीनगरात शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंबादास म्हस्के यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ला करण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरात खळबळ! शिवसेना उपजिल्हाप्रमुखांवर जीवघेणा हल्ला

छत्रपती संभाजीनगरात शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंबादास म्हस्के यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ला करण्यात आला आहे. बाबा पेट्रोलपंप चौकात गळाभेटीच्या बहाण्याने हा चाकू हल्ला करण्यात आला असून प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रविवारी रात्री उशिरा अंबादास म्हस्के यांना फोन करून आरोपी राम बोडखे याने भेटण्यासाठी बोलावले.  

त्यानंतर बाबा पेट्रोलपंप चौकात भेट झाल्यानंतर “मजाक करत होतो” असे म्हणत आरोपीने गळाभेट घेत अचानक चाकूने गळ्यावर वार केल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. गंभीर जखमी अवस्थेत म्हस्के यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी राम बोडखे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number