पुणे स्थानकावील फुटपाथवर झोपलेल्या अडीच वर्षाच्या चिमुकलीवर रेल्वेच्या डब्यात बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वेच्या डब्यात चिमुकली बेशुद्ध अवस्थेत सापडल्यानंतर तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना तिचा दुर्देवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
मंगळवारी पहाटे पुणे स्थानकाच्या फुटपाथवर आई वडिलांसह झोपलेली असताना अडीच वर्षाच्या चिमुकलीला घेऊन रेल्वेच्या डब्यात बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.
ही घटना मंगळवारी पहाटे पुणे स्थानकावर घडली.
पुणे स्थानकानजीक असलेल्या मालधक्का चौकातील फुटपाथवर चिमुकली राहत असून तिथेच पहाटे झोपली होती.
झोपली असताना चिमुकलीला उचलून रेल्वेच्या डब्यात बलात्कार केल्याचे समोर आले आहे.
रेल्वेच्या डब्यात चिमुकलीला त्याच अवस्थेत सोडून गेले असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांना ती सापडली.
पोलिसांनी तिला उचलून ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मात्र तिच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला.
बंड गार्डन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.