Congress Vs BJP : पोलिसाच्या त्या व्हिडीओवरून काँग्रेस-भाजपचे नेते भिडले; काँग्रेस नेत्याच्या प्रश्नावर भाजप नेते चितपट, तर भाजपनं लावून धरली सरकारची बाजू

मुंबई : दिल्लीसह देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुंबईतही अनेक भागांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलने केली असून पोलिसांनी ती थांबवण्याचा प्रयत्न केला. अशातच दादर येथील एका आंदोलनात पोलिसाने धरपकड करताना गर्दीतील एका मुलीला चुकीच्या पद्धतीने पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओने सोशल मीडियासह राजकीय वर्तुळातही खळबळ माजवली. पोलिसाच्या त्या व्हिडीओवर […]

Congress Vs BJP : पोलिसाच्या त्या व्हिडीओवरून काँग्रेस-भाजपचे नेते भिडले; काँग्रेस नेत्याच्या प्रश्नावर भाजप नेते चितपट, तर भाजपनं लावून धरली सरकारची बाजू

मुंबई : दिल्लीसह देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुंबईतही अनेक भागांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलने केली असून पोलिसांनी ती थांबवण्याचा प्रयत्न केला. अशातच दादर येथील एका आंदोलनात पोलिसाने धरपकड करताना गर्दीतील एका मुलीला चुकीच्या पद्धतीने पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओने सोशल मीडियासह राजकीय वर्तुळातही खळबळ माजवली. पोलिसाच्या त्या व्हिडीओवर मुंबई पोलिसांकडून आधी स्पष्टीकरणाची पोस्टी जारी करण्यात आली. मात्र काही तासांनंतर ती पोस्ट डिलीट केली गेली. याच मुद्द्यावर जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलने भाजपचे प्रवक्ता अजित चव्हाण आणि काँग्रेसचे प्रवक्ता बालाजी गाडे यांच्याशी संवाद साधला असता, दोघांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. संपूर्ण संभाषणात भाजपने सरकारची आणि पोलिसांची बाजू लावून धरली तर काँग्रेसनेही त्यांनी कोंडीत पकडणारे प्रश्न उपस्थित केले. पाहा या संभाषणाचा संपूर्ण व्हिडीओ… 

हेही वाचा : Pune CJP Protest : कॉक्रोच पार्टीचे देशव्यापी आंदोलन; पुण्यात प्रमुख रस्ते बंद, वाहतुकीत कोणते बदल?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number