शेतकऱ्यांवर दुष्काळाचं सावट, मंत्र्यांच्या ताटात काजू-बदाम; ‘अधिकाऱ्यांना डोकं नाहीये का?’, मंत्री संजय शिरसाटांचा सवाल

नांदेड : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज, शनिवारी नांदेड येथे शेतकऱ्यांच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा बैठकीत उपस्थिती दर्शवली होती. नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात ही आढावा बैठक पार पडली. मात्र, या बैठकीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुष्काळाच्या स्थितीवर चर्चा सुरू असताना लोकप्रतिनिधींचा जोरदार पाहुणचार करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींना चक्क काजू, बादामाचा खुराक देण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे […]

शेतकऱ्यांवर दुष्काळाचं सावट, मंत्र्यांच्या ताटात काजू-बदाम; ‘अधिकाऱ्यांना डोकं नाहीये का?’, मंत्री संजय शिरसाटांचा सवाल

नांदेड : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज, शनिवारी नांदेड येथे शेतकऱ्यांच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा बैठकीत उपस्थिती दर्शवली होती. नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात ही आढावा बैठक पार पडली. मात्र, या बैठकीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुष्काळाच्या स्थितीवर चर्चा सुरू असताना लोकप्रतिनिधींचा जोरदार पाहुणचार करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींना चक्क काजू, बादामाचा खुराक देण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे आठ जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करताना मंत्री आणि आमदार चक्क काजू बादाम खात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात खासदार संजय जाधव बादामावर ताव मारताना दिसत आहेत. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परिस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर काजू आणि बादामच्या प्लेट तातडीने हटवण्यात आल्या. मात्र, लोकप्रतिनिधींच्या बैठकीत काजू, बादामाचा पाहुणचार देण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना मंत्री, अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता बाळगावी, असे सूचक वक्तव्य केले. 

हेही वाचा : Crime : आजोबांना ठार करुन अंत्यसंस्कारही उरकले! 17 वर्षीय नातीचा बॉयफ्रेंडसोबत मिळून कट; अखेर कपडे धुताना….

दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकारावर संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना डोकं नाहीये का? असा सवाल उपस्थित केला. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मला या बैठकीला जाता आलं नाही. मात्र आमचे अधिकारी तिथे गेले आहेत. दत्ता भरणे त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. अधिकाऱ्यांवर काही गोष्टींची जबाबदारी असते. कोणत्या विषयावर बैठक सुरू आहे आणि आपण काय करतो हे अधिकाऱ्यांना समजलं पाहिजे, असं सांगतानाच अधिकारी काही गोष्टी करतात आणि बदनाम आम्ही होतो, असेही शिरसाट म्हणाले.

‘समोर ताट वाढल्यावर खाणे चुकीचा आहे का?’

मात्र बैठकीत उपस्थित खासदार बंडू जाधव यांनी काजू बदाम खाल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, समोर ताट आल्यावर खाणे हे चुकीचं आहे का, अशी प्रतिक्रिया दिली. विरोधक काही टीका करत असतील तर मी त्यांना जुमानत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

या बैठकीला राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, पालकमंत्री अतुल सावे, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, परभणीचे खासदार संजय जाधव, खासदार रामराव वडकुते, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार कल्याण काळे, खासदार अजित गोपछडे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, चंद्रकांत नवघरे, बाबुराव पाटील कोहळीकर, सैईद खान, कैलास पाटील, अमर राजूरकर, तुषार राठोड, आनंदाराव पाटील बोंढारकर यांच्यासह अनेक आजी माजी आमदार या बैठकीला उपस्थित आहेत. भाजपचे खासदार अशोक चव्हाण हे बैठकीला ऑनलाईन उपस्थित आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number