शिवराज्याभिषेक दिनी मुस्लीम तरुणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं वादाची ठिणगी पडलीय. तर दोन दिवसांपूर्वी, अहमदनगरमध्ये उरुसनिमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणूकीत काही तरुणांनी औरंगजेबाचा फोटो झळकावला होता. सर्वत्र ३५० व्या शिवराज्याभिषेकाचा सोहळा अतिशय उत्साहात पार पडत असताना एकीकडे औरंग्याचे स्टेट्स टाकण्याचा प्रकार घडला. यावरून चांगलाच वाद चिघळला आहे. तर दुसरीकडे औरंगजेबाचा पुतळा जाळल्याप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मनसे नेते संदीप देशपांडे आणि कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क येथे औरंगजेबाचा पुतळा जाळला होता. याप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव जमवून पुतळा जाळल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मुंबई पोलीस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.