BMC Elections 2026 : हलगर्जीपणाचा कळस! प्रचारावेळी बिल्डिंगला आग लागताच जीव धोक्यात टाकून पळ काढणाऱ्या कार्यकर्त्यांवर अभिनेत्री संतापली

प्रचारावेळी कार्यकर्त्यांच्या हलगर्जीपणामुळे इमारतीला आग लागली ज्यामुळे सलमान खानसोबत काम केलेली अभिनेत्री डेझी शाह संतापली.

BMC Elections 2026 : हलगर्जीपणाचा कळस! प्रचारावेळी बिल्डिंगला आग लागताच जीव धोक्यात टाकून पळ काढणाऱ्या कार्यकर्त्यांवर अभिनेत्री संतापली

राज्यातील एकूण 29 महापालिकेच्या निवडणुकांसाठी तयारीला लागले आहेत.या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबईत एकूण 2516 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान तसेच 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे. याचपार्श्वभूमिवर राजकीय पक्षांच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलचं चर्चेत आलं आहे. प्रचारादरम्यान अतिउत्साहीपणा कार्यकर्त्यांना नडला आहे. मुंबईत प्रचारावेळी कार्यकर्त्यांच्या हलगर्जीपणामुळे गालबोल लागले आहे. ‘जय हो’ या चित्रपटामध्ये सलमान खानसोबत काम केलेली अभिनेत्री डेझी शाहने सोशल मीडियावर पोस्ट करत सर्व प्रकरणी आवाज उठवला आहे.

हेही वाचा- Chandrashekhar Bawankule : “आमच्या प्रचारामध्ये आनंद व्यक्त केला, त्यात एवढं बोलायची काय गरज?” महापुरुषांच्या प्रतिमेसमोरील भोजपुरी नृत्याला बावनकुळेंच समर्थन
यावेळी अभिनेत्री म्हणाली की, “निवडणुकीच्या प्रचारासाठी इथे लोक जमले आहेत. ते रस्त्यावर फटाके फोडत असताना त्या फटाक्यांमुळे इमारतीतील एका घराला आग लागली. हे काही मूर्ख सरकारी अधिकारी प्रत्येक इमारतीत प्रचारासाठी आले, त्यावेळी ते इमारतीबाहेर रस्त्यावर फटाके फोडत होते. त्यांना समजत नाहीये का ? त्यांनी आग लावलीय. ते सर्वांच्या इमारतींमध्ये जाऊन प्रचार करत आहेत आणि आग लागल्यानंतर ते पळून गेले. ज्या इमारतीला आग लागली, त्याच्या बाजूलाच माझी इमारत आहे. हे भयानक आहे.” असं म्हणतं एक व्हिडिओ शेअर सोशल मीडियावर पोस्ट करत तिने घडलेल्या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. 

हेही वाचा- Demolition Encroachment : हायकोर्टाचा आदेश आणि 30 बुलडोझर मैदानात; जमावाकडून मध्यरात्री मोठा राडा
याचसोबत अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये कॅप्शन करत लिहले की, “माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी काहीही संबंध नाही!!! पण जेव्हा तुम्ही तुमच्या निवडणुकीसाठी प्रचार करण्यासाठी संघ नियुक्त करता तेव्हा कृपया त्यांच्यात थोडीशी सामान्य ज्ञान असल्याची खात्री करा. आमच्या बांधकाम समितीने त्यांना घरोघरी जाण्यास नकार दिला याबद्दल पूर्णपणे आभार.. इमारतींजवळ फटाके फोडणे हा मार्ग नाही. जेव्हा लोकांमध्ये नागरी जाणीव नसते तेव्हा असे घडते. ही नैसर्गिक आपत्ती नाही तर ती बुद्धीहीन लोकांमुळे येते. जबाबदारी घ्या… ही वेळ आहे.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number