बॉम्बच्या धमकीने विमान उझबेकिस्तानला वळवलं

रशियातील मॉस्कोहून गोव्याच्या दिशेने येणारं विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धमकीचा इ-मेल गोल्यातील डाबोलिम विमानतळ प्रशासनाला मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पावलं उचलंत हे प्रवासी विमान उझबेकिस्तानच्या दिशेने वळवलं आहे. या विमानावर तब्बल २४० प्रवासी होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात सविस्तर तपास लागलीच सुरू करण्यात आला आहे. याआधीही […]

बॉम्बच्या धमकीने विमान उझबेकिस्तानला वळवलं

रशियातील मॉस्कोहून गोव्याच्या दिशेने येणारं विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धमकीचा इ-मेल गोल्यातील डाबोलिम विमानतळ प्रशासनाला मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पावलं उचलंत हे प्रवासी विमान उझबेकिस्तानच्या दिशेने वळवलं आहे. या विमानावर तब्बल २४० प्रवासी होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात सविस्तर तपास लागलीच सुरू करण्यात आला आहे. याआधीही १० जानेवारी रोजी अशाच प्रकारची धमकी मॉस्को-गोवा विमानासंदर्भात देण्यात आली होती.

गोव्याच्या दिशेनं येणाऱ्या एखाद्या विमानाला बॉम्बनं उडवण्याची धमकी दिली जाण्याची ही दुसरी वेळ आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच अजुर एअरच्या एका चार्टर्ड प्लेनला बॉम्बनं उडवण्याची धमकी दिली होती. ज्यानंतर विमानाला गुजरातमध्ये जामनगरच्या दिशेनं वळवलं गेलं होतं. दरम्यान, अजुर एअरचं हे विमान AZV2463 पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गोव्याच्या दक्षिणेकडे असणाऱ्या डाबोलिम विमानतळावर लँड होणार होतं. पण, भारतीय हवाई हद्दीत येण्याआधीच त्याचा मार्ग वळवण्यात आला.

नेमकं काय घडलं?

Moscow-Goa AZV2463 हे प्रवासी विमान आज पहाटे ४ वाजून १५ मिनिटांनी दक्षिण गोव्यातील डाबोलिम विमानतळावर उतरणार होतं. मात्र, रात्री साडेबाराच्या सुमारास डाबोलिम विमानतळाच्या संचालकांना त्यांच्या ई-मेल आयडीवर विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेल आला. त्यामुळे विमान भारतीय हवाई हद्दीत शिरण्याआधीच हे उझबेकिस्तानकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number