केजरीवालांची हमी! रिक्षाचालकांसाठी केली मोठी घोषणा

ऑटो चालकांना 10 लाख रुपयांचा जीवन विमा दिला जाईल. यामध्ये 5 लाख रुपयांच्या अपघात विम्याचा समावेश असेल.

केजरीवालांची हमी! रिक्षाचालकांसाठी केली मोठी घोषणा

दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रिक्षा चालकांसाठी मोठी घोषणा केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी ऑटो चालकांसाठी केलेल्या घोषणेची माहिती आम आदमी पार्टीने फेसबुकवर तसेच x वर शेअर केली आहे.  केजरीवालांची पहिली हमी, आम आदमी पार्टीने दिल्लीत पुन्हा एकदा सरकार आल्यास ऑटो बंधवांसाठी अरविंद केजरीवाल यांनी 5 मोठ्या घोषणा केल्या आहेत. ऑटो चालकांना 10 लाख रुपयांचा जीवन विमा दिला जाईल. यामध्ये 5 लाख रुपयांच्या अपघात विम्याचा समावेश असेल. ऑटो चालकांच्या मुलीच्या लग्नासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

काय आहे घोषणा? 

1. दिल्लीतील ऑटो चालकांसाठी विमा असेल.

2. ऑटो चालकांना 10 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा असेल.

3.  ऑटोचालकाच्या मुलीच्या लग्नात 1 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

4.  ऑटो चालकांच्या गणवेशासाठी 2500 रुपये वर्षातून दोनदा खात्यात जमा होतील.

5.  ऑटो चालकांच्या मुलांच्या कोचिंगचा खर्च सरकार उचलणार आहे.

काय म्हणाले अरविंद केजरीवाल? 

"माझे रिक्षा चालकांसोबत खूप जुने नाते आहे. मला आठवते 2013 मध्ये जेव्हा माझा नवा पक्ष स्थापन झाला, तेव्हा दिल्लीत काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी दिल्लीत ऑटो चालकांची बदनामी केली जात होती. मी त्यांच्या समर्थनात होतो. ऑटो चालकांची मी एक बैठक घेतली. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही अनेक प्रकारची कामे केली. काल घरी ऑटो चालक बांधवांची भेट झाली. त्यांनी मला त्याच्या घरी जेवायला बोलावले. त्यांनी खूप छान जेवण बनवलं. मी आता ऑटो चालकांचं मीठ खाल्ले आहे, असंही केजरीवाल पुढे म्हणालेत." 

दरम्यान आता रिक्षा चालकांसाठी मोठी घोषणा केली असून दिल्लीत ऑटो चालकांसाठी अपघात विमा दिला जाणार आहे.  ऑटो चालकांच्या मुलांच्या कोचिंगचा खर्चही दिल्ली सरकार उचलणार आहे. त्याचबरोबर ऑटो चालकाच्या मुलीच्या लग्नासाठीही एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. एवढेच नाही तर वर्षातून दोनदा गणवेशासाठीचे पैसेही ऑटो चालकांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number