93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनाचं आयोजन उस्मानाबादेत करण्यात आलं आहे. या संमेलनासाठी एक आगळं वेगळं थीम साँग बनवण्यात आलं आहे.
आली साहित्याची वारी, गोरोबांच्या दारी, असं हे थीम साँग आहे. या गीताची रचना प्रसिद्ध गीतकार वैभव देशमुख यांनी केली आहे.
संमेलनाच्या प्रचारासाठी हे थीम साँग बनवण्यात आलं आहे.
थीम साँग बनवण्याची साहित्य संमेलनाच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.
या साहित्य संमेलनाचं आयोजन उस्मानाबादेत केले गेले आहे.
तसेच येत्या 10-12 जानेवारी असे 3 दिवस हे संमेलन असणार आहे.
या संमेलनासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर तयारी केली जात आहे.
या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे आहेत.
तर नितीन तावडे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत.
या साहित्य संमेलनात गोंधळ, ग्रंथपदर्शन, कवीसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम या आणि अशा अनेक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे.
या संमेलनाच्या 3 दिवसांच्या कालावधीत देशातील 600 कवी कविता सादर करणार आहे.