संतापजनक! 90 वर्षांच्या आजींची बलात्कार करून हत्या

एकीकडे अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या घटना वाढलेल्या असतानाच तेलंगणामध्ये माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे. 90 वर्षांच्या वयोवृद्ध आजींवर नराधमाने बलात्कार करून त्यांच्यी हत्या केल्याची संतापजनक घटना तेलंगणा येथे घडली आहे. या प्रकरणी 22 वर्षीय तरुणावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. तेलंगणा येथील नळगोंडा येथील अनुमुला या गावात ही भीषण घटना घडली आहे. पोलिसांनी […]

संतापजनक! 90 वर्षांच्या आजींची बलात्कार करून हत्या

एकीकडे अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या घटना वाढलेल्या असतानाच तेलंगणामध्ये माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे. 90 वर्षांच्या वयोवृद्ध आजींवर नराधमाने बलात्कार करून त्यांच्यी हत्या केल्याची संतापजनक घटना तेलंगणा येथे घडली आहे. या प्रकरणी 22 वर्षीय तरुणावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

तेलंगणा येथील नळगोंडा येथील अनुमुला या गावात ही भीषण घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीमुसार मयत 90 वर्षांच्या आजी घरात एकट्याच राहत होत्या. त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या घरापासून जवळच वास्तव्यास होते. सून घरी येऊन सासूचा स्वयंपाक करत असे. रविवारीदेखील सकाळी सासूसाठी चहा बनवण्यासाठी सून घरी आली होती. मात्र त्यावेळी तिला सासूचा मृतदेह आढळून आला. या प्रकारामुळे घाबरलेल्या सुनेने तात्काळ पोलीसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

वृद्ध आजींच्या शरीरावर दात आणि नखांच्या जखमा आढळून आल्यामुले आजीबाईंवर पाशवी बलात्कार करण्यात आल्याचा आणि नंतर हत्या केली गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी 22 वर्षीय तरुणावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. या तरुणाने यापूर्वी गावातील अनेक स्त्रियांची छेडछाड केल्याचा आरोप होतोय. हत्येच्या रात्रीच हा तरूण आजींच्या घराबाहेर घुटमळत असल्याचंही काही साक्षीदारांचं म्हणणं आहे. तसंच हत्येच्या घटनेपासून हा तरूण फरार आहे. त्यामुळे पोलिसांनीही या तरुणावर संशय व्यक्त करत त्याचा तपास करण्यास सुरूवात केली आहे. मात्र या घटनेमुळे देशात स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणखी वाढला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number