Solapur Accident : सोलापूरच्या भीषण अपघाताने राज्य हादरले! सरकारकडून इतक्या लाखांची मदत जाहीर

सोलापूर येथील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकप गाडी विहिरीत पडून भीषण अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.

Solapur Accident : सोलापूरच्या भीषण अपघाताने राज्य हादरले! सरकारकडून इतक्या लाखांची मदत जाहीर

सोलापूरच्या पंढरपुरातून अंगावर काटा आणेल असा अपघात घडला आहे. सोलापूर येथील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकप गाडी विहिरीत पडून भीषण अपघात झाला. यावेळी पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे 14 रहिवासी देवदर्शनासाठी गेले होते. परतत असताना त्यांच्यासोबत काळाने घात केला. या भीषण अपघातात पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे 8 ते 10 भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. मृतांमध्ये महिला, लहान मुलांचा देखील समावेश आहे.

तसेच 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले असल्याची बातमी समोर आली आहे. जखमीवर पंढरपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातामधील सर्व मृत भाविक पंढरपूरच्या रांजणी गावचे असून भाविक म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. सिद्धनाथांचं दर्शन करून गावाकडे परतत असताना माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक एका विहिरीत टेम्पो कोसळला. या घटनेनंतर मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सूरू आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील आहे.

हेही वाचा- Morena Railway Accident: रेल्वेला आग लागल्याच्या अफवेने घडला अनर्थ; घाबरून रुळावर उड्या मारणाऱ्या 4 प्रवाशांचा दुसऱ्या ट्रेनच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

या घटनेने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान वाहन चालकाचा नियंत्रण सुटून ज्या विहिरीत ही पिकअप वॅन कोसळली, त्या रस्त्यालगत असलेल्या या विहिराला सरंक्षण कठडा देखील नव्हती. तर ही विहिर पूर्णपणे उघडी होती. या भीषण अपघातानंतर संपूर्ण पंढरपुरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. या घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांच्या मदतीची घोषणा सरकारने केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

हेही वाचा- Solapur Malshiras Pickup Accident : आनंदाचा प्रवास क्षणात काळात बदलला! देवदर्शन करून परतणाऱ्या पिकअप गाडी विहिरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू

“सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे एक वाहन खाजगी शेतातील विहिरीत पडल्याने झालेल्या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. सुदैवाने 7 जणांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक दोघेही तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत आणि स्थानिक प्रशासनाशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. या घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारकडून देण्यात येईल.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number