रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली हरणे राज्य मार्गावर आसूद येथे रविवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि प्रवासी रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. समोरून येणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली त्यामुळे या अपघातातील सर्व जणांना गंभीर दुखापत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दापोली पोलीस दाखल झाले. यामध्ये दोन मुलींसहअन्यजणांचा सामावेश आहे. पाच जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात तर काही जखमीना मुबंईत हलवण्यात आल्याची माहिती आहे.
ट्रक आणि मॅजिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा प्रवाशांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. या अपघातात हर्णै येथील प्रवासी मॅजिक गाडीचालक अनिल उर्फ बॉबी सारंग यांचाही मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे मोठी खळबळ उडाली असून प्रथमदर्शनी ट्रक चालकाच्या चुकीमुळे चार जणांना जीव गमवावा लागल्याचा अंदाज आहे.