नाशकात मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम

नाशिक, १७ ऑगस्ट, प्रतिनिधी : नाशिककरांसाठी आनंदाची बातमी आहे. गंगापूर धरणातील साठा वाढू लागला असून शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ९० टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण ९० टक्के भरले तर आहे तर गंगापूर धरण समूहात एकूण ७६ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. दारणा धरणात ९३ टक्के इतका जलसाठा झाला आहे.शहरवासीयांना […]

नाशकात मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम

नाशिक, १७ ऑगस्ट, प्रतिनिधी : नाशिककरांसाठी आनंदाची बातमी आहे. गंगापूर धरणातील साठा वाढू लागला असून शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ९० टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण ९० टक्के भरले तर आहे तर गंगापूर धरण समूहात एकूण ७६ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. दारणा धरणात ९३ टक्के इतका जलसाठा झाला आहे.शहरवासीयांना पाणीपुरवठा करणारे जिल्ह्यातील प्रमुख धरण म्हणून गंगापूर ओळखले जाते. या धरणात उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर नागरिकांची भिस्त असते.

या धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाल्यानंतर मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडले जाते. जूनपासून जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पावसाचा जोर कमी असल्याने गंगापूरमध्येदेखील उपलब्ध पाणीसाठा मर्यादित होता. त्यामुळे पाणीकपातीची टांगती तलवार होती. परंतु, धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाणीसाठाही झपाट्याने वाढू लागला. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गंगापूर धरणातील उपयुक्त पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहोचला आहे.

जिल्ह्यातील भावती, केळझर हरणबारी ही धरणे शंभर टक्के भरली आहेत पालखेड ३९, करजवण ५६, वाघा ७२, ओझरखेड ३६. पुणेगाव ९२, चणकापूर ७५, पुनद ५४ टक्के भरते तर गिरणा धरणात आतापर्यंत फक्त ३४टक्के पाणी साठा असून ती चिंतेची बाब म्हणावी लागेल.

जिल्ह्यातील धरणांमध्ये आतापर्यंत ६३ टक्के इतका साठा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा सरासरी ९९टक्के इतका होता.. याचाच अर्थ गेल्या वर्षीच्या तुलनेने ऑगस्टच्या मध्यापर्यंत २६ टक्के इतका पाणीसाठा कमी आहे.राज्यातील इतर भागांच्या तुलनेने नाशिक जिल्ह्यात अजूनही म्हणावा तितका समाधानकारक पाऊस पडलेला नाही. थोडी उघडीप पडली असली आणि शेतीच्या कामांना वेग असता तरी अजूनही बलीराजा दमदार पावसाची अपेक्षा करीत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number