MP’s For Rajya Sabha : राज्यसभेच्या या 7 उमेदवारांची खासदारपदी अधिकृत बिनविरोध निवड झाल्याची घोषणा; विधान भवनात प्रमाणपत्र सुपुर्द

राज्यसभेच्या 7 उमेदवारांची खासदार म्हणून अधिकृत बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली

MP’s For Rajya Sabha : राज्यसभेच्या या 7 उमेदवारांची खासदारपदी अधिकृत बिनविरोध निवड झाल्याची घोषणा; विधान भवनात प्रमाणपत्र सुपुर्द

मुंबई : राज्यसभेच्या 7 उमेदवारांची खासदार म्हणून अधिकृत बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली असून यामध्ये शरद पवार, विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते, रामराव वडकुते, पार्थ पवार आणि ज्योती वाघमारे यांचा समावेश आहे. या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांना आज, सोमवारी विधान भवनातील निवडणूक कार्यालयात त्यांचे राज्यसभेवर निवडूण आल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. हे केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी आज विधान भवनात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार त्यांच्या कुटुंबासह उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले. राज्यसभेचे 7 खासदार आज त्यांचे प्रमाणपत्र घेण्यासाठी विधानभवनमध्ये दाखल झाले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या विश्रांतीच्या सल्ल्यानंतर शरद पवार मात्र राज्यसभा खासदार प्रमाणपत्र घेण्यासाठी स्वतः उपस्थित राहू शकले नाहीत. तर शिंदे गटाच्या शिवसेना राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे या प्रमाणपत्र घेण्यासाठी स्वतः आई-वडिलांना सोबत घेऊन विधानभवनात दाखल झाल्या. ज्योती वाघमारे विधान भवनाच्या पायऱ्या चढताना त्यांना कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांच्या सोबत भेट झाली. त्यावेळी नवनिर्वाचित ज्योती वाघमारे यांनी मंत्री नरहरी झिरवळ यांची ओळख आई-वडिलांना करून दिली.

हेही वाचा : Baramati Govt. Medical College : बारामती रुग्णालयाचे नामकरण वादात! लक्ष्मण हाके यांचा राज्य सरकारला इशारा; OBC समाज आक्रमक

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number