गजानन महाराजांच्या पालखीचे ५४ वे वर्ष

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे टाळ-मृदुंगाच्या गजरेत आज दुपारी आगमन झाले आहे. त्यांच्या स्वागतासाठी अंबानगरी सज्ज होऊन रांगोळ्यांनी या पालखीचे स्वागत करण्यात आले. २६ मे रोजी आषाढी वारीसाठी श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे शेगाव येथून प्रस्थान झाले आहे. दोन दिवसांच्या परळी येथील मुक्कामानंतर पालखीचे गुरूवारी सकाळी अंबाजोगाई शहरात आगमन झाले. पालखीचे […]

गजानन महाराजांच्या पालखीचे ५४ वे वर्ष

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे टाळ-मृदुंगाच्या गजरेत आज दुपारी आगमन झाले आहे. त्यांच्या स्वागतासाठी अंबानगरी सज्ज होऊन रांगोळ्यांनी या पालखीचे स्वागत करण्यात आले. २६ मे रोजी आषाढी वारीसाठी श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे शेगाव येथून प्रस्थान झाले आहे. दोन दिवसांच्या परळी येथील मुक्कामानंतर पालखीचे गुरूवारी सकाळी अंबाजोगाई शहरात आगमन झाले. पालखीचे हे ५४ वे वर्ष असून पालखीत शेगाव येथून तीन अश्व ,७०० वारकरी सहभागी आहेत. यात काही टाळकरी तर काहींच्या हातात भगवा पताका आहे. संत गजानन महाराज पालखी सोहळा हा अत्यंत शिस्तबद्ध म्हणून ओळखला जातो. श्री संत गजानन महाराज पालखीचा मुक्काम अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार असून रात्री भजन कीर्तन कार्यक्रम होणार आहेत. तर सकाळी ८.०० वाजता पालखी पंढरपूरसाठी अंबाजोगाई शहरातून प्रस्थान होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number