धक्कादायक! राज्यात 800 तर पुण्यातील 51 शाळा बोगस असल्याचा खुलासा

महाराष्ट्रातील 800 हून अधिक शाळांना बोगस असल्याचं समोर आलं. यापैकी 100 शाळा आधीच कायमच्या बंद करण्यात आल्या आहेत.

धक्कादायक! राज्यात 800 तर पुण्यातील 51 शाळा बोगस असल्याचा खुलासा
Edited Image

पुणे: शालेय शिक्षण विभागाने पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि पुणे जिल्हा प्राधिकरणाच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या 51 अनधिकृत शाळा बोगस असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. अलिकडच्या मूल्यांकनानंतर महाराष्ट्रातील 800 हून अधिक शाळांना बोगस असल्याचं समोर आलं. यापैकी 100 शाळा आधीच कायमच्या बंद करण्यात आल्या आहेत. 2025-26 शैक्षणिक वर्षाच्या आधी विभागाने 1300 संस्थांमध्ये तपासणी केली.

1300 शाळांची तपासणी –  

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची प्रत्यक्ष संख्या सध्या उघड झालेल्यापेक्षा बरीच जास्त असू शकते. विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, विभागाने राज्यात बेकायदेशीरपणे कार्यरत असल्याचा संशय असलेल्या सुमारे 1300 शाळांची तपासणी केली आहे. सुरुवातीला 800 हून अधिक शाळांमध्ये कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या. पुण्यात 51 शाळा बोगस असल्याचे निश्चित झाले आहे आणि ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. पालकांनी कोणत्याही संशयास्पद शाळांची माहिती विभागाला द्यावी, असं आवाहनही अधिकाऱ्यांनी केलं आहे. 

हेही वाचा – वर्ध्यातून हिंदुत्वाचा हुंकार! पश्चिम बंगालच्या अन्यायाविरुद्ध जन आक्रोश मोर्चा

बेकायदेशीर शाळा बंद करण्याचे निर्देश – 

या निष्कर्षांनंतर, शालेय शिक्षण आयुक्तांनी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि पुणे येथील सर्व बेकायदेशीर शाळा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशात या संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी मान्यताप्राप्त शाळांमध्ये सामावून घेण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. तथापी, शिक्षण अधिकाऱ्यांना शिक्षण उपसंचालक कार्यालयाला सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. 

हेही वाचा – ठाकरे बंधू पुन्हा एकत्र? राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

अनधिकृत शाळा केवळ पालकांवर आर्थिक भार टाकत नाहीत तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीतही अडथळा आणतात. त्यामुळे पालकांनी त्यांच्या मुलांची नोंदणी करण्यापूर्वी शाळेची सत्यता पडताळणे आवश्यक असल्याचंही अधिकाऱ्यांनी आवाहन केलं आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number