मुंबईतील ५०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ होणार

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्याची सरकारची भूमिका आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबई महापालिका कायद्यात सुधारणा करणारे विधेयक संमत करण्यात आले. ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट देण्याबाबत पालिकेने पाठविलेल्या प्रस्तावाशी सरकार सहमत आहे. मात्र केवळ सामान्य करात सूट न देता मालमत्ता व […]

मुंबईतील ५०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ होणार

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्याची सरकारची भूमिका आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मुंबई महापालिका कायद्यात सुधारणा करणारे विधेयक संमत करण्यात आले. ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट देण्याबाबत पालिकेने पाठविलेल्या प्रस्तावाशी सरकार सहमत आहे. मात्र केवळ सामान्य करात सूट न देता मालमत्ता व त्याअनुषंगाने लावण्यात येणाऱ्या सेवाशुल्कासह हा संपूर्ण कर माफ करण्यात येणार आहे. त्याबाबत योग्यवेळी निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number