८ वर्षात रस्ते प्रकल्पाच्या किंमतीत ४०५% वाढ

रस्ते बांधकाम खर्चाची किंमत जास्त प्रमाणात असल्यामुळे मुंबईतील रस्ता प्रकल्प भारताचे नियंत्रक आणि महालेका परीक्षक कॅगने खर्चाची छाननी केली आहे. २०१८मध्ये बांधकाम सुरू झाले असून बांदकामाचे खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे, कॅगने बीएमसीच्या कोस्टल रोड विभागाच्या एप्रिल २०१६ ते मार्च २०२० या कालावधीतील खर्चाची छाननी करुन बीएमसीला प्रश्न उपस्थित केला आहेत. तसेच ८ वर्षामध्ये […]

८ वर्षात रस्ते प्रकल्पाच्या किंमतीत ४०५% वाढ

रस्ते बांधकाम खर्चाची किंमत जास्त प्रमाणात असल्यामुळे मुंबईतील रस्ता प्रकल्प भारताचे नियंत्रक आणि महालेका परीक्षक कॅगने खर्चाची छाननी केली आहे. २०१८मध्ये बांधकाम सुरू झाले असून बांदकामाचे खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे, कॅगने बीएमसीच्या कोस्टल रोड विभागाच्या एप्रिल २०१६ ते मार्च २०२० या कालावधीतील खर्चाची छाननी करुन बीएमसीला प्रश्न उपस्थित केला आहेत. तसेच ८ वर्षामध्ये रस्ते प्रकल्पाच्या किंमतीत ४०५% वाढ झाल्याचे कॅगने स्पष्ट केले आहे.

कॅगच्या अहवालात, ‘दंड वसूली, दंडाची वसुली न होणे, व्याजातून होणारे उत्पन्न, कंत्राटदार आणि सल्लागारांना केलेले जादा/अवाजवी पेमेंट’ यापासून २०० कोटींच्या आर्थिक व्यवहारांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

कॅगने नमूद केले आहे की, ‘हे असे दिसून आले आहे की १६ जुलै २०१९ ते १ जानेवारी २०२० या कालावधीत काम पूर्णपणे थांबवले गेले होते आणि ते पुन्हा २ जानेवारी २०२० रोजी सुरू करण्यात आले. अशा प्रकारे, कंत्राटदाराला या कालावधीसाठी काम म्हणून कोणतेही पैसे मिळण्यास पात्र नाही. तथापि, कंत्राटदाराला अदा केलेल्या बिलांच्या छाननीत ७३.९२ कोटी + ६८.२७ कोटीची देयके उघडकीस आली, ज्यामध्ये १६ जुलै २०१९ ते १ जानेवारी २०२० या कालावधीतील देयकांचा समावेश आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number