गेल्या 10 दिवसांत PMPML बसेसच्या ब्रेकफेलच्या 4 घटना

पुणे आणि पिपरी चिंचवड शहराची लाईफलाईन समजली जाणारी PMPML सध्या अडखळत सुरु आहे. प्रशासनाने नुकत्याच नवीन बसेस खरेदी केल्या असल्या तरीही जुन्या आणि बंद पडलेल्या बसेसचे पार्ट एकत्र करुन एक नवीन केलेली जुनी बस रस्त्यावर प्रवाशांच्या सेवेसाठी सोडली जातेय. मात्र यामुळे पुणेकरांचा प्रवास सुखाचा होईल याची कुठलीही शाश्वती नाही. कारण गेल्या कित्येक दिवसात पुणेकर यामधून […]

गेल्या 10 दिवसांत PMPML बसेसच्या ब्रेकफेलच्या 4 घटना

पुणे आणि पिपरी चिंचवड शहराची लाईफलाईन समजली जाणारी PMPML सध्या अडखळत सुरु आहे. प्रशासनाने नुकत्याच नवीन बसेस खरेदी केल्या असल्या तरीही जुन्या आणि बंद पडलेल्या बसेसचे पार्ट एकत्र करुन एक नवीन केलेली जुनी बस रस्त्यावर प्रवाशांच्या सेवेसाठी सोडली जातेय. मात्र यामुळे पुणेकरांचा प्रवास सुखाचा होईल याची कुठलीही शाश्वती नाही. कारण गेल्या कित्येक दिवसात पुणेकर यामधून थोडक्यात बचावलेत…

पुण्यातील दिवेघाटात पीएमपीएमएल बसच्या ड्रायव्हरच्या प्रसंगावधानाने प्रवाशांचा जीव वाचला होता. निम्मा घाट ओलांडल्यानंतर एका वळणावर बसचे ब्रेक लागत नसल्याचे चालकाच्या लक्षात आलं. याची माहिती त्याने कंडक्टरला दिली. प्रवाशांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर बसमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. पुढे काही कळण्याच्या आत चालक प्रसंगावधान दाखवत बसला डोंगरालगतच्या कोपऱ्यात घातलं. बस थांबल्यानंतर प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. चालकाने प्रसंगावधान दाखवून बस थांबविली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती. हडपसर आगाराची ही बस सकाळी 6 वाजता सासवड स्थानकातून स्वारगेटच्या दिशने निघाली होती. साडे सहा वाजण्याच्या सुमारास बसने निम्मा घाट पार केला होता. त्यावेळी बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते.

गेल्या दहा दिवसांत पुणे शहरात ब्रेक फेलच्या चार घटना घडल्यात.

16 ऑगस्ट रोजी बेंगलुरू महामार्गावर आंबेगाव बुद्रुकजवळ बसचा ब्रेक फेल झाला

17 ऑगस्टला स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गात भारती हॉस्पिटलसमोर बसचा ब्रेक फेल झाला.

22 ऑगस्टला तोफखानाजवळ बसचे ब्रेकफेल झाल्याची घटना, दोन प्रवासी किरकोळ जखमी.

26 ऑगस्टला दिवे घाटातच ब्रेकफेल झाले.

सुदैवाने चारही घटनांमध्ये प्रवाशांना दुखापत झाली नाही.

सध्या दोन्ही शहरात मिळून जवळपास तीस ते बत्तीस लाख प्रवासी प्रवास करत आहेत. प्रवासी संख्येच्या तुलनेत बसेसची संख्या फारच कमी आहे. एका बसचं आयुर्मान हे जवळपास सात लाख किलोमीटर किंवा दहा वर्षे इतकं असतं. अशा जवळपास 400 बसेस सध्या या रस्त्यावरती धावतायत, अशी माहिती खुद्द प्रशासनाकडून देण्यात आलीय.

नवीन बसेस जरी वाढल्या असल्या तरी जुन्या बसेसची देखभाल दुरुस्ती साठी खर्च वाढत आहे.

नवीन बसेसच्या संख्येत वाढ होत नाही तोपर्यंत जुन्या बसेस रस्त्यावर सोडाव्या लागणार आहेत.

ब्रेक फेलसारख्या घटना रोखण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांना लक्ष घालण्यास सांगितलं गेलंय.

सध्या पुणे शहरात मेट्रोचं काम सुरू आहे. मेट्रो कधी धावेल याची प्रतीक्षा पुणेकरांना आहे, मात्र सध्या खिळखिळ्या झालेल्या बसमधूनच पुणेकरांना प्रवास करावा लागतोय. यात पुणेकरांचा प्रवास सुखकर व्हावा हीच अपेक्षा प्रत्येकाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number