कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान मालमत्तेच्या देखभालीच्या कामासाठी आज तीन तासांचा ‘मेगाब्लॉक’ लावण्यात येणार आहे. सकाळी ७.३० ते १०.३० या कालावधीत तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा थेट परिणाम होणार आहे.
यामुळे दादर-सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस रोहा ते रत्नागिरी दरम्यान २.३० तास रोखून ठेवली जाणार आहे. इतर गाड्या देखील थांबवल्या जातील. यात कोकण कन्या एक्सप्रेस , मांडवी एक्स्प्रेस याही गाड्या थांबवल्या जातील.