Jitendra Awhad: ‘तुकाराम मुंढेंना हटवण्यासाठी 250 कोटींची सुपारी…’; जितेंद्र आव्हाडांचा विधानसभेत खळबळजनक दावा

तुकाराम मुंढे यांना या पदावरून हटवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज लॉबी आणि बड्या मेडिकल कंपन्यांनी एकत्र येत तब्बल 250 कोटी रुपयांचा निधी गोळा केला असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Jitendra Awhad: ‘तुकाराम मुंढेंना हटवण्यासाठी 250 कोटींची सुपारी…’; जितेंद्र आव्हाडांचा विधानसभेत खळबळजनक दावा

Jitendra Awhad: अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामगिरीमुळे हे खाते सध्या देशभरात केंद्रस्थानी आले आहे. मात्र, याच प्रामाणिक कामगिरीमुळे ते आता माफियांच्या निशाण्यावर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत एक अत्यंत धक्कादायक आरोप केला आहे. तुकाराम मुंढे यांना या पदावरून हटवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज लॉबी आणि बड्या मेडिकल कंपन्यांनी एकत्र येत तब्बल 250 कोटी रुपयांचा निधी गोळा केला असून त्यांची मोठी 'सुपारी' घेण्यात आल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे. पुढील आठवड्यात या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधारांच्या नावासहित पर्दाफाश करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

एफडीए विभागाची दुरवस्था आणि भेसळीचे जाळे
आमदार आव्हाड यांनी सभागृहात राज्यातील भेसळयुक्त अन्न आणि औषधांच्या रॅकेटवर तीव्र चिंता व्यक्त केली. बाजारातील वाढत्या भेसळीमुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे ते म्हणाले. पालघरमध्ये उतरणारा गुटखा संपूर्ण महाराष्ट्रात कसा फिरतो? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी जाणारे नमुने 'सेटअप' करून फेल केले जातात आणि मोठे आर्थिक व्यवहार होतात, असा आरोप त्यांनी केला. मंत्री नरहरी झिरवाळ हे साधे गृहस्थ असून त्यांच्यावर या विभागातील लॉबीचा प्रचंड दबाव आहे. मुंढे आल्यापासून पहिल्यांदाच या काळ्या बाजाराला चाप बसला असून, आश्रमशाळांमध्ये जाणाऱ्या भेसळयुक्त तांदळासारखे प्रकार रोखण्यासाठी जनतेनेच आता मुंढेंच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन आव्हाडांनी केले.

हेही वाचा – Mallikarjun Kharge: भाजपचा थेट हल्ला! मल्लिकार्जुन खर्गेंसह मुलावर 100 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप

'टायगर' मुंढेंच्या जीवाला धोका; संरक्षणाची मागणी
या चर्चेदरम्यान भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी उभे राहत, "मुंढे यांच्या नावातील 'टी' (T) हा 'टायगर'चा आहे. ते उत्कृष्ट काम करत असून त्यांना किमान 3 वर्षे याच पदावर ठेवले पाहिजे," अशी मागणी केली. दरम्यान, मुंढे यांना सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने आमदार अर्जुन खोतकर यांनी त्यांच्या जीवाला मोठा धोका असून त्यांना तातडीने कडक सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी केली आहे. यावर उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मुंढेंच्या बदलीचा कोणताही प्रश्न येत नसल्याचे स्पष्ट केले, तसेच विभागातील अधिकाऱ्यांना आवश्यक गाड्या आणि कार्यालये उपलब्ध करून दिली जातील, असे आश्वासन दिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number