Kolhapur Zilla Parishad Election 2026 : कोल्हापुरातील 23 लाख 40 हजार मतदार; परिषदेसाठीच्या 241, तर पंचायत समितीसाठीच्या 455 उमेदवारांना करणार मतदान

कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

Kolhapur Zilla Parishad Election 2026 : कोल्हापुरातील 23 लाख 40 हजार मतदार; परिषदेसाठीच्या 241, तर पंचायत समितीसाठीच्या 455 उमेदवारांना करणार मतदान

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 गट आणि पंचायत समितीच्या 136 गटांसाठी 2691 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी 6,975 मतदान यंत्रे सज्ज ठेवली आहेत. जिह्यात एकूण 23 लाख 40 हजारांहून अधिक मतदार असून 14 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते. साधारण, पावणेनऊ वर्षांनी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी 241, तर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी 455 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दोन्हीसाठी अनुक्रमे 418 आणि 578 जणांनी माघार घेतल्यामुळे लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, बहुतांशी ठिकाणी तिरंगी लढती होत आहेत. महायुतीमधील तीनही पक्ष राजकीय लढाईत एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. 

या निवडणुकीसाठी युवा आणि मध्यमवयीन राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येत आहे. बहुतांश पक्षांनी आपापल्या सोयीनुसार आघाडी आणि युती केल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच राजकीय सोय म्हणूनही मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होत असून, मतदानाच्या दिवसापर्यंत पक्षांतर, पाठिंबा, सोडचिठ्ठीचे हे प्रकार सुरू राहिल्याचे चित्र दिसून आले.

जिल्हा परिषदेसाठी उमेदवारांची माघार – 418
पंचायत समित्यांसाठी उमेदवारांची माघार – 758
68 जागांसाठी रिंगणातील उमेदवार – 241
पंचायत समित्यांसाठी रिंगणातील उमेदवार – 455

हेही वाचा : Zilla Parishad Elections 2026: जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मोठा बदल; मार्करला रामराम, मतदारांच्या बोटावर पुन्हा शाई

तालुकानिहाय उमेदवार 

जिल्हा परिषद उमेदवार  – 

शाहूवाडी – 13 
पन्हाळा – 27
हातकणंगले – 41
शिरोळ – 24 
करवीर – 45 
गगनबावडा – 5 
राधानगरी – 23
कागल – 16
भुदरगड – 10 
आजरा – 8 
गडहिंग्लज – 20
चंदगड – 9
एकूण – 241

पंचायत समिती उमेदवार –

शाहूवाडी – 19
पन्हाळा – 40
हातकणंगले – 74
शिरोळ – 42
करवीर – 81
गगनबावडा – 8
राधानगरी – 46
कागल – 39
भुदरगड – 23
आजरा – 18
गडहिंग्लज – 39
चंदगड – 26
एकूण – 455

सध्याची राजकीय परिस्थिती –

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी यंदा बाराही तालुक्यात राजकारणाचे बारा रंग पहावयास मिळत आहेत. ग्रामीण भागातील राजकारणाचा पोतच या निवडणुकीने बदलल्याचे दिसून येत असून पारंपरिक राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली आहे.
हातकणंगले तालुक्यातील 11 जिल्हा परिषद आणि 22 पंचायत समितीसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट दुरंगी सामना होत आहे. तर एका ठिकाणी शिंदेसेनेच्या बंडखोराने घाम फोडला असून दुसरीकडे महायुतीमधील भाजपनेच जनसुराज्यच्याविरोधात उमेदवार दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number