‘आम्हाला ही जागा लढवायची होती…’

मुंबई, ३० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेच्या निमित्ताने पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी ‘आम्हाला ही जागा लढवायची होती’ अशी प्रतिक्रिया दिली. यामिनी जाधव या भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार आहेत. आमदार असलेल्या यामिनी जाधव लोकसभा निवडणुकीत अरविंद सावंत यांच्या विरोधात […]

‘आम्हाला ही जागा लढवायची होती…’

मुंबई, ३० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेच्या निमित्ताने पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी ‘आम्हाला ही जागा लढवायची होती’ अशी प्रतिक्रिया दिली.

यामिनी जाधव या भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार आहेत. आमदार असलेल्या यामिनी जाधव लोकसभा निवडणुकीत अरविंद सावंत यांच्या विरोधात मैदानात उतरल्या आहेत. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत दोन टर्म खासदार आहेत. आता तिसऱ्यांदा ते खासदारकीची निवडणूक लढवत आहेत. यामुळे अरविंद सावंत यांच्या विरोधात कोणीतरी सक्षम उमेदवार दिला जाईल, अशी चर्चा होती. या चर्चेत यामिनी जाधव यांचे नाव आघाडीवर कुठेच नव्हते. यामुळे त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माध्यमांनी महायुतीचे महत्त्वाचे नेते म्हणून फडणवीस यांची प्रतिक्रिया घेतली. यावेळी बोलताना, आम्हाला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा लढवायची होती; असे फडणवीस म्हणाले. पण महायुतीच्या अंतर्गत चर्चेत शिवसेना ही जागा लढवणार हा निर्णय झाला. यानंतर शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

भाजपाकडून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढण्यास कोण होते इच्छुक ?

मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number