राहुल अमेठीतून लढणार ?

नवी दिल्ली, २५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाडमधून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. वायनाडमध्ये शुक्रवारी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. हे मतदान झाल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन राहुल आणखी एका मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेसने अमेठी लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. यामुळे अमेठीतून राहुल गांधीच […]

राहुल अमेठीतून लढणार ?

नवी दिल्ली, २५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाडमधून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. वायनाडमध्ये शुक्रवारी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. हे मतदान झाल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन राहुल आणखी एका मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेसने अमेठी लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. यामुळे अमेठीतून राहुल गांधीच लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याआधी २०१९ मध्ये राहुल गांधी यांनी अमेठी आणि वायनाड या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. राहुल २०१९ च्या निवडणुकीत अमेठीतून पराभूत झाले आणि वायनाडमधून जिंकले होते. यावेळी निकाल काय लागणार हे ४ जून रोजी मतमोजणीतून जाहीर होईल. पण वायनाडचे मतदान सुरू होण्याआधीच राहुल यंदा किमान दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number